विजय दिनाच्या परेडला उपस्थित राहणार नाहीत.
विशेष प्रतिनिधी
मॉस्को :PM Modi पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे.PM Modi
रशियातील विजय दिनाच्या परेडमध्ये ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत सामील होणार होते, परंतु आता त्यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने हे निमंत्रण स्वीकारले होते.
विजय दिन परेड कधी आहे?
दरवर्षी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये विजय दिन परेड आयोजित केली जाते. हे रेड स्क्वेअरवर आयोजित केले जाते. रशियन सशस्त्र दलांच्या या परेडला खूप महत्त्व आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात आणि मुख्य भाषण देतात. या कार्यक्रमाद्वारे रशिया आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करतो. दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझी जर्मनीवर केलेल्या निर्णायक विजयाचे स्मरण करण्यासाठी ही परेड आयोजित केली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App