VIDEO : अमेरिकन गायिका मेरी मिलीबेनने प्रथम गायले भारताचे राष्ट्रगीत अन् नंतर केले मोदींचे चरण स्पर्श

या घटनेचा व्हिडीओ व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन डीसी  : अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोनाल्ड रीगन सेंटरमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. हॉलिवूड गायिका मेरी मिलीबेन हिने कार्यक्रमाच्या शेवटी मंचावरून भारतीय राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीतानंतर तिने मंचावर उपस्थित पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला. American singer Mary Milben first sang Indias national anthem and then touched Modis feet

या घटनेचा व्हिडीओ व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या कार्यक्रमात बोलताना मेरी मिलीबेन म्हणाली की, पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.

त्याआधी रोनाल्ड रीगनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही सर्वांनी अमेरिकेत एक भारत, श्रेष्ठम भारताचे चित्र निर्माण केले आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मला अमेरिकेत जो सन्मान मिळतो आहे, त्याचे श्रेय अमेरिकेत तुम्ही केलेल्या मेहनतीला आणि अमेरिकेच्या विकासासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना जाते. अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन करतो.

भारताच्या या प्रगतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचा आत्मविश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले, आज देश प्रगतीपथावर आहे हा १४० कोटी भारतीयांचा विश्वास आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आमच्याकडून हा आत्मविश्वास हिरावून घेतला होते, असे मोदी म्हणाले. आज आपल्यासमोर असलेल्या नव्या भारतात हा आत्मविश्वास परत आला आहे. हाच भारत आहे, ज्याला त्याचा मार्ग, दिशा माहीत आहे. हा असा भारत आहे, ज्याच्या मनात आपल्या निर्णयांबद्दल आणि संकल्पांबद्दल कोणताही संभ्रम नाही.

American singer Mary Milben first sang Indias national anthem and then touched Modis feet

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात