नाशिक : डोनाल्ड ट्रम्पचे बोल वाकडे; त्यांच्या अमेरिकेनेच वाचले पाहिजेत हे आकडे!!, असे म्हणायची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेमुळे आली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांची अर्थव्यवस्था नष्टप्राय होत असल्याचे दावे केले. भारतावर 25% टेरिफ लादला. भारत रशियाकडून तेल घेतो म्हणून दंड लावायची भाषा केली, पण जे डोनाल्ड ट्रम्प भारतावर 25% टेरिफ लादून भारतालाच टेरिफ किंग म्हणून शिव्या घालताहेत. पण त्यांच्या अमेरिकेने लादलेले टेरिफ आणि भारताचे सर्वसामान्य टेरिफ यांचे आकडे वाचले तरी वेगळेच वास्तव समोर येते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ लादला, तरी भारताचे अमेरिकन वस्तूंवरचे टेरिफ सरासरी 17 % आहेत, ही वस्तुस्थिती काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी समोर आणली. त्याचवेळी त्यांनी भारताने अमेरिकेबरोबर वाटाघाटी करताना हा आकडा समोर ठेवूनच वाटाघाटी केल्या पाहिजेत, हा आग्रह धरला. अमेरिकेच्या टेरिफ संदर्भातल्या अवास्तव मागण्या सरकारने मान्य करू नयेत. अमेरिका जर असाच आडेलतट्टूपणा करत राहिली, तर भारताने मुक्त व्यापार कराराचे नवीन पर्याय शोधावेत. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला ही शक्य आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.
त्याचवेळी अमेरिकेने वेगवेगळ्या वस्तूंवर लादलेले टेरिफ आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने सादर केलेले आकडेही समोर आले. ते अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कन्फर्म केले. हे फार जुने आकडे नाहीत, तर ते 2024 मधले आकडे आहेत.
– WTO आकडेवारीनुसार
– अमेरिका काही तंबाखूच्या उत्पादनांवर तब्बल 350 % शुल्क लावते
– अमेरिका दुधाच्या काही उत्पादनांवर विशेषतः काही दूध पावडर वर आणि चीज वर 200 % शुल्क आकारते
– त्याचबरोबर अमेरिका काही फळे भाज्या डाळी आणि रेडिमेड अन्न उत्पादनांवर 130 % शुल्क आकारते.
एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे शुल्क आकारताना अमेरिका वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कायद्याकडेच बोट दाखवते. ही आकडेवारी जरी कायदेशीरदृष्ट्या टोकाची असली आणि ती अमेरिका सगळ्याच उत्पादनांवर लादत नसली, तरी अमेरिका स्वतःच्या हिताच्या दृष्टीकोनातून ही टेरिफ लादते आणि शुल्क आकारते, हेच दर्शविते. पण भारताने व्यापार करारामध्ये अमेरिकेच्या अटी शर्ती मान्य करायला नकार दिल्यानंतर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी उर्मट उद्गार काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App