वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चांद्रयान मोहिमेसाठी देश एकवटला; काँग्रेस सह सर्व विरोधकांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या!!, असे आज 23 ऑगस्ट 2023 रोजी घडले आहे. एरवी देशातल्या कुठल्याच मुद्द्यांवर बिलकुल एकत्र येत नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी चांद्रयान मोहिमेसाठी मात्र वैज्ञानिकांना शुभेच्छा देताना एकजूट दाखवली आहे. All the opposition including Congress wished the scientist well
चांद्रयान 3 आज सायंकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण भागावर उतरेल. ही मोहीम अचूक पार पाडण्यासाठी भारतीय वैज्ञानिक कसून प्रयत्न करत आहेत. दुपारी 2.00 वाजेपर्यंत चांद्रयानाचा प्रवास अपेक्षित रित्या सुरू आहे. त्याची अपडेट इस्रोने दिली आहे.
देशात सर्व मोठ्या मंदिरांमध्ये आणि अन्य धर्मीय प्रार्थना स्थळांमध्ये चांद्रयानाच्या यशस्वीतेसाठी लोक प्रार्थना करत आहेत. अनेक मोठ्या मंदिरांमध्ये महायज्ञाचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशाचे डोळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे एकत्रित येणे आणि वैज्ञानिकांना चांद्रयान मोहिमेसाठी शुभेच्छा देणे ही दुर्मिळ घटना आहे. देशात कुठलीही यशस्वी घटना घडली किंवा देशाने एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली तरी राजकीय पक्ष आता पूर्वीसारखे एकत्र येत नाहीत. कुणीतरी राजकीय टक्के टोणपे मारत ते यशस्वी घटनेत मिठाचा खडा टाकतात, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.
पण चांद्रयान 3 मोहीम या गोष्टीला अपवाद ठरली आहे. काँग्रेस सह सर्व विरोधकांनी चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा देताना भारतीय वैज्ञानिकांचे दिलखुलास अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी “ब्रिक्स” परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका येत आहेत ते जोहान्सबर्ग मधून इस्रोच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जोडले जाणार आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शालेय विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री निवासात बोलवले आहे. या विद्यार्थ्यांसमवेत ते चांद्रयान 3 च्या लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग अनुभवणार आहेत. देशात अनेक राजकीय पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय केली आहे. चांद्रयान उतरण्यापूर्वीची शेवटची 18 मिनिटे हे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App