पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांचे हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने जगातल्या सर्व देशांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यानुसार जगातले सगळे देश भारताला अनुकूल झालेत. त्यामुळे आता मोदी सरकारची कसोटी आणि पाकिस्तानचे कंबरडे कायमचे मोडायची घेतलीच पाहिजे संधी!! अशी समस्त भारतीयांची अपेक्षा निर्माण झाली आहे.
कुठले तरी शांतीचे आणि पोकळ संयमाचे फालतू तत्वज्ञान मोदी सरकारने टाकून देऊन आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरण स्वीकारले यालाही आता १० वर्षे उलटून गेली. त्यामुळे मोदी सरकारकडून भारतीय जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुलवामा आणि उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारच्या निर्णयामुळे भारतीय फौजांनी पाकिस्तान वर सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करून दोन्ही हल्ल्यांचा बदला घेतला. आता त्या पलीकडे जाऊन पाकिस्तानचे कंबरडे कायमचे मोडले पाहिजे, अशी मोदी सरकारकडून जनतेने अपेक्षा केली, तर त्यात गैर काही नाही. कारण ही अपेक्षा मूळातच मोदी सरकारच्या आक्रमक धोरणामुळेच वाढली आहे.
अमेरिकेपासून इराण पर्यंत आणि रशिया पासून युक्रेन पर्यंत सगळ्या देशांनी भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाला पाठिंबा दिला आहे. सगळ्यांनी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. पण त्या निषेधाचे स्वरूप केवळ तोंडी आणि सोशल मीडियावर लिहिण्यापुरते राहिले आणि त्याचे रूपांतर प्रत्यक्ष प्रतिहल्ल्यात झाले नाही, तर मोदी सरकारची आक्रमक प्रतिमा ढासळायला एक मिनिटाचा देखील वेळ लागणार नाही.
राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना मोदी सरकारची खेचली. त्यांचे काश्मीर मधले धोरण अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पण त्यांच्या तसल्या टीकेला भीक घालण्यापेक्षा मोदी सरकारने आपले आक्रमक धोरण अधिक आक्रमक करून पाकिस्तानी जिहादला धर्मयुद्धाने उत्तर दिले पाहिजे, ही अपेक्षा म्हणजे काही केवळ भावना भडकवायची किंवा कुठल्यातरी हिंसाचाराला चिथावणी द्यायची, अशी नव्हे तर पाकिस्तानला जी जिहादची भाषा समजते, तिला त्याच भाषेत म्हणजेच धर्मयुद्धाच्या भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, ही खरी अपेक्षा आहे.
पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याला जर तो हिंदूंपासून वेगळा वाटत असेल, तर त्याला तसे वाटू द्यावे, पण त्याला रावळपिंडीतच उभा गाडल्याशिवाय त्याने सुरू केलेल्या जिहादविरुद्धचे धर्मयुद्ध थांबवू नये.
जिहाद विरुद्धचे धर्मयुद्ध
पहलगाम मधील हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था NIA करेल. त्याचे काही निष्कर्ष काढेल. ते निष्कर्ष खरेही असतील, पण मूळात kuranic concept of war म्हणजेच जिहादी युद्ध हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मूळ स्वरूप बदलणार नाही. त्यामुळे त्या हल्ल्याचा बदला धर्मयुद्धाच्याच आधारे घेता येणे शक्य आहे. दहशतवादाला धर्म नसतो ही अफूची गोळी खाणे किंवा दहशतवाद्यांनी केवळ targeted killings केली, असे राजदीप सरदेसाई स्टाईलने म्हणून हिंदूंवरच्या हल्ल्याला कमी लेखणे बंद केले पाहिजे. हिंदूंवर हल्ला करणारे दहशतवादी मुसलमान होते. त्यांनी जिहादी युद्धानुसारच हिंदू पर्यटकांना मारले. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने हिंदू विरोधी जिहादी भाषण केले म्हणूनच दहशतवाद्यांना पर्यटकांना मारण्यासाठी चिथावणी मिळाली, ही उघड दिसणारी वस्तुस्थिती कुठल्यातरी लिबरल बौद्धिक आर्ग्युमेंटला भुलून नजरेआड करू नये. तरच भारतीय जनता इथून पुढे मोदी सरकारच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाची थोडी तरी बूज ठेवेल, अन्यथा जनता मोदींची गणनाही नेहरूंसारख्या बोटचेप्या नेत्यांमध्ये करून टाकेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App