दोन वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.त्यात आता ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा परीक्षांबाबत संभ्रम आहे. All rights regarding examination to local administration – Uday Samant
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल होत.दरम्यानन कोरोनच सावट कमी झाल्यावर आता राज्यभरात महाविद्यालय सुरू झाली आहेत.दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.त्यात आता ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा परीक्षांबाबत संभ्रम आहे.
यासंदर्भात बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.दरम्यान सामंत म्हणाले की , “परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचे अधिकार स्थानिक प्रशासनला दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक अधिकारी निर्णय घेतील.”
उदय सामंत त्यांनी यावेळी विद्यापीठ कुलगुरू नेमणुकीविषयी सुद्धा भाष्य केलं.यावेळी ते म्हणाले की , “केंद्र सरकारने याबाबत जे धोरणं अवलंबलं आहे तेच आम्ही करतोय. आम्ही चुकत असू तर केंद्र सरकारही चुकत आहे.”असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
विद्यापीठांच्या प्र-कुलपतीपदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील अशी तरतूद विद्यापीठ अधिनियमात करणे तसेच कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून नावांची शिफारस राज्यपालांना करण्याबाबत @CMOMaharashtra उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. pic.twitter.com/GlJzhNtkYC — Uday Samant (@samant_uday) December 15, 2021
विद्यापीठांच्या प्र-कुलपतीपदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील अशी तरतूद विद्यापीठ अधिनियमात करणे तसेच कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून नावांची शिफारस राज्यपालांना करण्याबाबत @CMOMaharashtra उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. pic.twitter.com/GlJzhNtkYC
— Uday Samant (@samant_uday) December 15, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App