Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

Pakistan drones

ऑपरेशन सिंदूरवरील लष्कराच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे जाणून घ्या


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Pakistan drones भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू झाली. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.Pakistan drones

त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या महासंचालकांनी (DGMOs) ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषद घेतली. तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंगपूर्वी ऑडिओ-व्हिडिओ प्रेझेंटेशन देखील दिले. या पत्रकार परिषदेदरम्यान, एअर मार्शल ए.के. भारती, लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस ॲडमिरल ए.एन. प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा उपस्थित होते.



ऑपरेशन सिंदूरची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल ए.के. यांनी दिली. भारती आणि व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे –

या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानी घुसखोरीला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचे मोठे नुकसान पोहचवले. युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सीर अहमद हे भारताच्या निशाण्यावर होते. गुप्तचर यंत्रणेच्या आधारे, 9 दहशतवादी तळांची पुष्टी झाली. मुख्य लक्ष्य: भावलपूर आणि मुरीदके होते.

युद्धबंदीनंतरही, यूएव्ही आणि लहान ड्रोनचा हल्ला भारतीय नागरी आणि लष्करी क्षेत्रात झाला, मात्र हे ड्रोन यशस्वीरित्या रोखण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी याला चोख प्रत्युत्तर दिले. शिवाय, सर्व फील्ड कमांडर्सना कोणत्याही युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

All Pakistan drones destroyed more than 100 terrorists killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात