विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुत्सद्देगरीने पाकिस्तानला चागलाच दणका बसला आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीला रशिया, इराण आणि मध्य आशियातील देशांनी येणे मान्य केले आहे. अफगणिस्तानातील घडामोडींवर बैठकीत चर्चा होणार आहे.All countries except Pakistan will participate in the meeting on Ajit Doval’s diplomacy on Afghanistan
पाकिस्तानच्या NSA ने भारतात अफगाणिस्तानवरील परिषदेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र रशिया, इराण आणि मध्य आशियाई देशांनी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. चीनकडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
भारत 10 नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सुरक्षा संवाद ऑन अफगाणिस्तान’ आयोजित करत आहे. ही बैठक राष्ट्रीय सुरक्षा सललागार च्या स्तरावर असेल आणि भारताचे अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या स्वरूपाच्या अंतर्गत यापूर्वीच्या दोन बैठका, सप्टेंबर 2018 आणि डिसेंबर 2019 मध्ये इराणमध्ये झाल्या आहेत. कोविड -19 महामारीमुळे भारतात तिसरी बैठक यापूर्वी होऊ शकली नाही. मध्य आशियाई देशांनी तसेच रशिया आणि इराणने सहभागाची पुष्टी केली आहे,”
केवळ अफगाणिस्तानच्या जवळचे शेजारीच नव्हे तर सर्व मध्य आशियाई देश या स्वरूपामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असे अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रादेशिक प्रयत्नांमध्ये भारताच्या भूमिकेचे महत्त्व यामुळे अधोरेखित झाले आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App