विशेष प्रतिनिधी
अलीगढ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या कुलगुरूंच्या विरोधात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पोस्टरबाजी सुरू करण्यात आली आहे. याप्रकारचे तालीबानी विचार सहन केले जाणार नाहीत असा इशारा देत उत्तर प्रदेश सरकारने पोस्टरबाजी करणाऱ्यां वर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.Aligarh Muslim University posters in protest of Vice-Chancellor paying homage to Kalyan Singh
मुळचे अलीगढ जिल्ह्यातील असलेले कल्याणसिंग यांचे नुकतेच निधन झाले. कुलगुरू तारिक मन्सूर यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर विद्यापीठाच्या आवारात पोस्टरबाजी सुरू करण्यात आली. या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, गुन्हेगारासाठी प्रार्थना करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. कुलगुरूंची श्रध्दांजली ही केवळ लाजिरवाणीच नाही तर आमच्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे.
कल्याण सिंह हे बाबरी मशीद पाडण्यातील केवळ मुख्य गुन्हेगारच नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दलही गुन्हेगार आहे. कुलगुरूंच्या शोकसभेमुळे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील बंधुता, परंपरेवर यामुळे घाला पडला आहे. न्याय आणि निष्पक्षतेवर विश्वास ठेवणारी अलीगढ चळवळ बदनाम झाली आहे. आमच्या कुलगुरूंच्या लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध करतो.
उत्तर प्रदेश सरकारने याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यमंत्री मोहसीन रझा म्हणाले की, कुलगुरूंनी संस्कृती पाळली आहे. असे पोस्टर लावणे म्हणजे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठात तालीबानी विचाराचे लोक असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. म्हणजे येथून पुढे ते एक उदाहरण बनेल. हे हिंदुस्थानचे विद्यापीठ आहे. तालिबानमधील दहशतदवाद्यांचा गट नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App