अक्षय कुमारचा रामसेतू अडचणीत : सुब्रमण्यम स्वामींनी खिलाडी कुमारसह 8 जणांना पाठवली कायदेशीर नोटीस; खोटी तथ्ये दाखवल्याचा आरोप


वृत्तसंस्था

मुंबई : अक्षय कुमार त्याच्या आगामी राम सेतू चित्रपटासाठी सुब्रमण्यम स्वामींच्या निशाण्यावर आहे. स्वामी यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. स्वामी म्हणाले की, ‘मुंबईच्या सिनेमाला किंवा (सिन-ए-मावाल्यांनी) गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्याची सवय आहे. त्यामुळेच मी माझे वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत अक्षय कुमार (भाटिया) आणि 8 जणांना बौद्धिक संपदा अधिकारांच्या माहितीसाठी नोटीस पाठवली आहे. वास्तविक, अक्षयच्या चित्रपटात राम सेतूबाबत चुकीचे तथ्य दाखवले जात असल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.Akshay Kumar’s Ram Sethu in trouble Subramanian Swamy sends legal notice to 8 including Khiladi Kumar; Allegation of misrepresentation

गत महिन्यात दिला होता इशारा

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी दोन ट्विटमध्ये चित्रपटाचे निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यावर खटला भरण्याचे सांगितले होते. जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून देशाबाहेर काढण्याची मागणी करू शकतो, असे स्वामी यांनी म्हटले आहे.भाजप नेते स्वामी यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. त्यांनी त्यांचा आगामी राम सेतू हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. त्यांच्या चित्रपटामुळे राम सेतूची प्रतिमा खराब झाली आहे. माझे वकील सत्य सभरवाल यांनी खटल्याचा मसुदा अंतिम केला आहे.

राम सेतूच्या पोस्टरसाठी अक्षय ट्रोल

नुकतेच राम सेतूचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्याला पाहून अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला. या पोस्टरमध्ये अक्षय गुहेसारख्या ठिकाणी उभा असून हातात टॉर्च घेऊन काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासोबत उभ्या असलेल्या जॅकलिनच्याही हातात टॉर्च होती. टॉर्च आणि टॉर्चला एकत्र पाहून यूजर्सनी दोन्ही कलाकारांना खूप ट्रोल केलं.

अक्षय साकारतोय पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका

राम सेतूमध्ये अक्षय एका पुरातत्त्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे, जो भारत आणि श्रीलंका यांच्यातील राम सेतूबद्दल सत्य शोधण्यासाठी काम करत आहे. मुंबईशिवाय अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाच्या शूटिंगला मुंबईतून सुरुवात झाली होती, मात्र त्याचा मुहूर्त अयोध्येत घेण्यात आला होता.

राम सेतू 24 ऑक्टोबरला होणार रिलीज

अक्षयव्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. विक्रम मल्होत्रा ​​आणि अरुणा भाटिया यांनी निर्मिती केली आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हे या चित्रपटाचे सर्जनशील निर्माते आहेत. याची रिलीजची तारीख 24 ऑक्टोबर 2022 आहे.

Akshay Kumar’s Ram Sethu in trouble Subramanian Swamy sends legal notice to 8 including Khiladi Kumar; Allegation of misrepresentation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात