#बॉयकॉट रक्षाबंधन : अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची नायिका कनिका ढिल्लनने आता हटवली हिंदू विरोधी ट्विट्स!!

प्रतिनिधी

मुंबई : सध्या सोशल मीडियावर #बॉयकॉट लालसिंग चढ्ढा जोरात ट्रेंड सुरू असताना अक्षय कुमारचा “रक्षाबंधन” सिनेमा येतो आहे. त्याचे प्रमोशन अक्षय कुमारने सुरू केले आहे. परंतु, अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची नायिका कनिका ढिल्लन ही मात्र हिंदू विरोधी आहे. Akshay Kumar’s Rakshabandhan heroine Kanika Dhillon has now deleted her anti-Hindu tweets

तिने आत्तापर्यंत आपल्या ट्विटर हँडल वरून आणि अन्य सोशल मीडिया अकाउंट वरून हिंदू विरोधात अनेक कंटेंट व्हायरल केले आहेत. पण आता जेव्हा “रक्षाबंधन” सिनेमा येतो आहे, तेव्हा कनिकाने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून सगळी हिंदू विरोधी ट्विट्स हटवली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आमिर खानचा सिनेमा लालसिंग चढ्ढा याच्यावर बहिष्कार घालण्याची जी मोहीम सुरू आहे, त्यामध्ये आता अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची देखील भर पडली आहे!!

लालसिंग चढ्ढा सिनेमा हा फॉरेस्ट गम्प ऑस्कर विजेत्या सिनेमाचा रिमेक आहे. त्या सिनेमाशी आमिर खानच्या लालसिंग चढ्ढाची तुलना सुरू आहेच. त्यामुळेही आमिर खान अडचणीत आला आहे. आमिर खानने प्रेक्षकांना लालसिंग चढ्ढा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे. मात्र आमिर खानने आत्तापर्यंत भारत विरोधात आणि हिंदू विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेधार्थ #बॉयकॉट लालसिंग चढ्ढा आजही सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे.

आता त्यामध्ये अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची देखील भर पडली आहे आणि त्याला कारणीभूत सिनेमाची नायिका कनिका ढिल्लन ठरत आहे. तिने मॉब लिंचींगवरुन हिंदू समाजावर टीका करणारी तसेच विविध हिंदू देवी देवतांचा अपमान करणारी ट्विट केली आहेत. मात्र आता “रक्षाबंधन” सिनेमा स्क्रीनवर झळकण्यापूर्वी ही सगळी ट्विट तिने हटवली आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या अनेकांच्या ही बाब लक्षात आल्यानेच #बॉयकॉट रक्षाबंधन ही मोहीम देखील सोशल मीडियावर जोर पकडताना दिसत आहे.

Akshay Kumar’s Rakshabandhan heroine Kanika Dhillon has now deleted her anti-Hindu tweets

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात