अखिलेश यादव यूपीच्या मैनपुरीत पत्नीच्या प्रचारात मग्न; पण गुजरातमध्ये भाजप हरण्याचा आशेवर!!

वृत्तसंस्था

मैनपुरी : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदारसंघात आपली पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारासाठी गेला आठवडाभर जीवाचे रान करत होते. आज तिथे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. पण याच पोटनिवडणुकीतल्या मतदानाच्या दिवशी अखिलेश यादव यांनी मात्र गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. Akhilesh Yadav didn’t even turn up to gujrat, but expressed his desire to defeat BJP in gujrat polls

हेच अखिलेश यादव गुजरातची अख्खी विधानसभा निवडणूक झाली, प्रचार संपला आज मतदान होत आहे. पण तोपर्यंत गुजरातकडे फिरकले देखील नव्हते. त्या उलट त्यांनी आपले सगळे लक्ष मैनपुरी लोकसभा मतदारसंघावरच केंद्रित केले होते. मैनपुरी लोकसभा मतदारसंघ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव यांचे पिताश्री मुलायम सिंह यादव यांचा होता. ते तिथून खासदार होते. त्यांच्या निधनानंतर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे आणि तिथे अखिलेश यादव यांनी आपल्या पत्नी डिंपल यादव यांना उभे केले आहे.

स्वतः अखिलेश गेल्या आठवडाभरापासून डिंपल यादव यांच्यासाठी मैनपुरी मतदारसंघातच तळ ठोकून होते. तेथे त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला होता. पण आज प्रत्यक्ष मतदान होताना मात्र त्यांनी मैनपुरीतूनच गुजरात मध्ये भाजपचा मोठा पराभव होईल अशी आपल्याला आशा वाटते, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियात राजकीय खिल्लीचा विषय ठरला आहे.

Akhilesh Yadav didn’t even turn up to gujrat, but expressed his desire to defeat BJP in gujrat polls

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात