विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपला फटकारून अखिलेश यादव यांनी घराणेशाहीच्या पक्षांच्या अध्यक्षांवर आज अमित शाह यांच्याकडून पुढच्या 25 वर्षांचे “शिक्कामोर्तब” करवून घेतले.
– त्याचे झाले असे :
लोकसभेत waqf बोर्ड सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत भाग घेताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी भाजपला वेगवेगळ्या विषयांवरून चिमटे काढले. त्यात त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा मुद्दा देखील उकरून काढला. एवढा मोठा भाजप पक्ष, जो स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो, तो अजून स्वतःचा अध्यक्ष निवडून शकलेला नाही, असा टोमणा अखिलेश यादव यांनी भाजपला मारला.
अखिलेश यादव यांच्या या टोमण्याचे रूपांतर गृहमंत्री अमित शाह यांनी संधी मध्ये कन्व्हर्ट केले. अखिलेश यादव यांनी भाजपच्या अध्यक्षपदावरून टोकताच अमित शहा उठले आणि म्हणाले, अखिलेशजींनी भाजपच्या अध्यक्ष पदाविषयी आम्हाला टोकले. पण त्यांनी हसत हसत हे सगळे सांगितल्याने मी देखील हसत हसतच उत्तर देतो.
समोर बसलेले चार-पाच पक्ष जे आहेत, त्यांना घरातूनच अध्यक्ष नेमायचेत. त्यामुळे अखिलेश यादव यांनी पुढची 25 वर्षे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून स्वतःला घोषित करावे. त्याला आमची काही हरकत नाही. भाजपमध्ये मात्र कसे होत नाही. कारण 12 – 13 कोटी सदस्यांमधून लोकशाही प्रक्रिया करून अध्यक्ष निवडावा लागतो. त्यामुळे अध्यक्ष निवडायला आम्हाला वेळ लागतो. अमित शाह यांचा हा प्रतिटोला ऐकताच अखिलेश यादव यांनी हात जोडत त्यांच्या प्रतिटोल्याला प्रतिसाद दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App