विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धडा घेऊन 2024 – 25 चा अर्थसंकल्प मांडला. त्यात युवकांच्या हाताला रोजगार, शेती क्षेत्र, महिला आणि उद्योगांसाठी भरपूर तरतुदी यांचा समावेश केला. आंध्र आणि बिहार या दोन राज्यांना एकत्रित मिळून 75 हजार कोटी रुपयांच्या तरतुदी केल्या. मात्र याच मुद्द्यावर महाराष्ट्रातले विरोधक केंद्र सरकारवर भडकले असून त्यांनी महाराष्ट्राच्या तोंडाला मोदी सरकारने पाने पुसल्याची हाकाटी चालवली, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पातील विशिष्ट तरतुदींच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रासमोर वेगळीच वस्तुस्थिती मांडली. Ajit pawar presented the facts from the statistics
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले, पण अजितदादांनी या बजेटमधून मोदी सरकारने महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकली, असे अजितदादांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले :
मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे.
शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
1) शेती क्षेत्रात उत्पादकतावाढ, 2) रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकासावर भर, 3) मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष, 4) उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास 5) शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर, 6) ऊर्जासंरक्षण 7) पायाभूत सुविधांचा विकास 8) संशोधन व विकासाला प्राधान्य, 9) नव्या पीढीसाठी सुधारणा या 9 क्षेत्रांना दिलेलं प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, देशाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा निर्णय आहे.
Union Budget 2024 : महाराष्ट्राला बजेट मध्ये काही नसल्याची टीका; पण विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने वाचला तरतुदींचा पाढा!!
शेतीसाठी 1.52 ला कोटींची तरदूत
शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत 5 वर्षांसाठी वाढवत आली आहे. त्यामुळे देशातील 80 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली आहे.
ईपीएफधारक 21 कोटी युवकांना लाभ
युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या 5 वर्षात 20 लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘ईपीएफओ’मधील नोंदणीवर आधारित योजनेंतर्गत, पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना 1 महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे. 21 कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. पुढील 5 वर्षात देशातील 500 कंपन्यांमध्ये किमान 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात 12 इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होईल, असा मला विश्वास आहे.
पीएम आवास योजनेसाठी तरतूद
रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही औषधांना अबकारी शुल्कातून वगळण्याचा निर्णय असेल, मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टींवरील अधिभार 15 % कमी करण्याचा निर्णय असेल, लिथियम बॅटरी स्वस्त करण्याचा निर्णय असेल, पीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत शहरात राहणाऱ्या 1 कोटी गरीब नागरिकांना 10 लाख कोटी रुपये खर्चून बांधून देण्याचा निर्णय आणि त्यासाठी पुढील 5 वर्षात 2.5 लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठरतील.
इन्कमटॅक्स मध्ये अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी महत्वाचा आहे. यातून त्यांची किमान 17500 रुपयांची बचत होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50000 वरून 75000 पर्यंत वाढवणे. पेन्शनची मर्यादा 15000 हजारांवरून 25000 पर्यंत वाढवणे. हेही निर्णय महत्वाचे असून 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे, मी या निर्णयाचेही स्वागत करतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App