नाशिक : महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या राजकीय इतिहासात कधीही मुख्यमंत्री पद न मिळू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पण राज्यातल्या नव्या राजकीय पार्श्वभूमीवर या सत्कार समारंभासाठी कोणते माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत??, याची उत्सुकता मराठी माध्यमांनी निर्माण केली आहे.
शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस नामक पक्ष 1999 पासून 2025 पर्यंत कधीही मुख्यमंत्री पद मिळवू शकला नाही. या पक्षाने या पक्षाने स्वकर्तृत्वावर कधीही 100 सोडा 75 आमदारांचा आकडा देखील काढला नाही. कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन आपापल्या सहकारी संस्था, सहकारी आणि खासगी साखर कारखाने, संघटना पोसत राहणे एवढेच त्या पक्षाचे काम राहिले. पण मित्र पक्षांमध्ये काड्या घालण्याचे काम मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने नियमितपणे केले.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षांमध्ये काड्या घालायचे काम राष्ट्रवादीने केले आहे. या सत्काराला राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले आहे. अर्थातच हे सगळे वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत आणि सध्या ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये देखील आहेत. नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पण ते सध्या भाजपचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते.
त्यामुळे सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हे सगळे नेते एकत्र जमवायचा “उद्योग” जरी राष्ट्रवादी काँग्रेसने करून पाहिला असला तरी तो “उद्योग” जमेलच, याची कोणीही गॅरंटी देऊ शकले नाही. कारण एवढे सगळे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रादेशिक पक्षाच्या नादी लागून एकत्र येण्याची शक्यता नाही.
वास्तविक शिवसेना हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्याच सर्वसाधारण ताकदीचा पक्ष. पण शिवसेनेचे आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले. भाजपबरोबरच्या युतीमध्ये शिवसेनेचे किमान 15 ते 20 वर्ष वर्चस्व राहिले. त्या उलट काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीला नेहमी दुय्यम स्थान राहिले. राष्ट्रवादीला एकदाही मुख्यमंत्री पद मिळवता आले नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासारखे नेते सतत “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर चढत राहिले. त्यांच्या समर्थकांनी “भावी मुख्यमंत्र्यांयांचे” केक कापले. पण अखंड किंवा फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कधीच मिळवता आली नाही. कारण तेवढे खरे राजकीय कर्तृत्व पवार किंवा त्यांच्या समर्थकांना कधी दाखवताच आले नाही.
अशा स्थितीत फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राचे कुठलेही माजी मुख्यमंत्री सत्कार स्वीकारतील, ही शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मुख्य माजी मुख्यमंत्री यांच्या सत्काराचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या पक्षांमध्ये काड्या घालण्याचा उद्योग फोल ठरण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App