विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अफगाणिस्तानचे सैन्य ताबिलान पुढे फार काळ टिकाव धरू शकत नाही. कारण अधिकारी आणि कॅडरमध्ये मोठी दरी आहे आणि यामुळे तालिबानची एकजुटता सैन्यावर वरचढ ठरेल, अशी भविष्यवाणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केली होती. ही आता खरी ठरल्याचे दिसत आहे.Ajit Doval’s prediction came true, saying eight years ago that the Afghan government would not stand up to the Taliban
म्हणजे भारतीय लष्काराच्या एका निवृत्त अधिकाºयाने शेअर केलेला एक व्हिडिओ. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एच.एस. पनाग यांनी ‘द ग्रेट स्पायमास्टर’ या शिर्षकाखाली २०१३ मधील एका व्हिडिओ काही भाग शेअर केला आहे. अफगाणिस्तानचे सैन्य आणि पोलिस एकजुटीने देशाचं संरक्षण करण्यास यशस्वी होतील, असं सांगितलं जात असल्याचं अजित डोवल म्हणत आहेत.
अजित डोवल यांनी पाकिस्तानी सैन्यातील काही जनरल्ससोबत झालेल्या चचेर्तील अनुभवही सांगितला होता. अफगाणिस्तानचे सैन्य ताबिलान पुढे फार काळ टिकाव धरू शकत नाही. कारण अधिकारी आणि कॅडरमध्ये मोठी दरी आहे आणि यामुळे तालिबानची एकजुटता सैन्यावर वरचढ ठरेल, असं पाकिस्तानी जनरल्स म्हणाल्याचं डोवल यांनी सांगितलं.
पण आपल्याला पाकिस्तानी जनरल्सच्या दाव्यावर विश्वास नाही. असं काही होणार नाही, असं मलाही वाटतं. पण एक मोठा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.नजीबुल्लाहच्या सैन्याला अधिक चांगले प्रशिक्षित करण्यात आले होते. पण तेही तालिबानसमोर टिकू शकले नाही. अमेरिकेने खूप चांगले काम केले. पण अनेक त्रुटी आहेत, ज्या दूर करण्याची गरज आहे.
अफगाणिस्तान सरकार, अमेरिका किंवा अफगाणिस्तानच्या सेनेला या त्रुटी कायम ठेवायच्या होत्या, असं नाही. तर अफगाणिस्तानचं सैन्य बळकट होऊ नये, यासाठी या त्रुटी पाकिस्तानला हव्या होत्या, म्हणून त्या ठेवल्या गेल्या, असं अजित डोवल या व्हिडिओमध्ये म्हटले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App