वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Ajay Seth १९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.Ajay Seth
१ मार्च रोजी तुहिन कांत पांडे यांची सेबीचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून वित्त सचिव पद रिक्त होते. अजय सेठ सध्या महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी अजय यांनी आर्थिक व्यवहार विभागात सचिवपदही भूषवले आहे.
वरिष्ठ नोकरशहा अजय हे त्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या अनुभवासाठी ओळखले जातात. आर्थिक व्यवहार सचिवपद भूषवत असताना, अजय यांनी देशाची आर्थिक धोरणे आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधानांकडून सन्मान
अजय सेठ यांना २०१३ मध्ये पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नाटकातील व्यावसायिक कर प्रशासनाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.
अजय सेठ यांच्या नियुक्तीमुळे देशातील आर्थिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक वित्त क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
तुहिन कांत पांडेंबद्दल…
तुहिन कांत पांडे हे १९८७ च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. मोदी ३.० सरकारमधील ते भारतातील सर्वात व्यस्त सचिवांपैकी एक आहेत. ते सध्या केंद्र सरकारमधील चार महत्त्वाचे विभाग सांभाळत आहेत. ७ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची वित्त सचिव म्हणून नियुक्ती झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App