कारगिल युद्धात भाग घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी शुक्रवारी हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल एसपी धारकर यांची जागा घेतली जे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले.
हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, एअर मार्शल तिवारी गांधीनगरस्थित साउथ वेस्टर्न एअर कमांड (SWAC) चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून काम करत होते. वायुसेनेने X वर पोस्ट करून ही माहिती दिली.
एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे एनडीए आणि यूएस एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी, फायटर पायलट, टेस्ट पायलट आहेत. त्यांना ३६०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्येही भाग घेतला.
दरम्यान, शुक्रवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक (डीजी डीआयए) लेफ्टनंट जनरल डीएस राणा हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अंदमान आणि निकोबार कमांड (एएनसी) चे पुढील कमांडर-इन-चीफ असतील. लेफ्टनंट जनरल राणा १ जून रोजी पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App