विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान प्रवाशांची संख्या कमालीची कमी झाली असून आज एअर इंडियाच्या विमानाने केवळ एका प्रवाशासह अमृतसरहून दुबईकडे उड्डाण केले. संपूर्ण विमानात आणि तेही इकॉनॉमी क्लासमध्ये केवळ एकच प्रवासी असल्याचे ऐकून आपल्याला आश्चिर्य वाटेल. परंतु ही घटना सत्य आहे. Air India flew with only one passenger
यूएईत राहणारे भारतीय उद्योगपती एस पी सिंह ओबेरॉय यांनी अमृतसर ते दुबईपर्यतचा हवाई प्रवास एकट्याने केला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीत राहणारे एस.पी. सिंग हे तीन तासाच्या प्रवासात एकटेच होते.
त्यांना घेऊन एअर इंडियाच्या विमानाने पहाटे ३.४५ वाजता उड्डाण केले. यावेळी प्रवासी ओबेरॉय यांनी विमानातील कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढले. यापूर्वीही मागच्या महिन्यात एअर इंडियाच्या विमानाने एकच प्रवाशांसह दुबईला उड्डाण केले होते. १९ मे रोजी मुंबई दुबई विमानात ४० वर्षीय भावेश झवेरी हे एकमेव प्रवासी होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App