या विमानात 107 प्रवासी होते, दिल्ली पोलिसांना बॉम्बची धमकी देणारा फोन आला होता.Air India
विशेष प्रतिनिधी
दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानास मंगळवारी रात्री उशीरा बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. मात्र, विमान उतरल्यानंतर कसून तपासणी केल्यानंतर बॉम्बची धमकी ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना बॉम्बची धमकी देणारा फोन आला होता, त्यानंतर एअरलाइन आणि विशाखापट्टणम विमानतळाला सतर्क करण्यात आले.
रेड्डी पुढे म्हणाले की, “विमान सुरक्षितपणे उतरले आणि सखोल तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, हा खोटा फोन होता.” त्यांनी सांगितले की विमानात 107 प्रवासी होते आणि विमान दिल्लीहून विशाखापट्टणमला येत होते. विमानतळ संचालकांच्या म्हणण्यानुसार, विमान लँडिंगनंतर लगेचच रिकामे करण्यात आले आणि त्यानंतर तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही.Air India
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला ठोकले; पण पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला बाजूला सारले!!
एअर इंडियाचे विमान मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीहून विशाखापट्टणमला जात होते. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास विशाखापट्टणम विमानतळ कर्मचाऱ्यांना बॉम्बची धमकी देणारा फोन आला. यावेळी विमान आकाशात उडत होते. विमानात 107 प्रवासी होते, त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. विमान विशाखापट्टणम विमानतळावर उतरताच सुरक्षा दल आणि बॉम्ब निकामी पथकाने विमानाला वेढा घातला.
त्यानंतर श्वानपथकासह विमानात सखोल तपासणी मोहीम राबविण्यात आली. तसेच सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढून सेफ झोनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. मात्र चौकशीअंती काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यानंतर विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस राजा रेड्डी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकीचा गुन्हा दाखल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App