विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांच्या पावलावर समाजवादी पार्टीचे पाऊल; ताटातले वाटीत आणि वाटेतले ताटात घेऊन!! असे आज पुण्यात घडले. पुण्यातल्या एआयएमआयएम पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टी प्रवेश केला. या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी उपस्थित होते. त्यांनी एआयएमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचे समाजवादी पार्टीत स्वागत केले.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम पक्ष आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी यांच्या तत्वतः फारसा फरकच नाही. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये कार्यकर्ते एकमेकांकडे जाणे यात काही विशेष घडले असे नाही. उलट यानिमित्ताने समाजवादी पार्टीने शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकले, असेच दिसून आले. शरद पवारांनी देखील लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि आता विधानसभा निवडणुकीदरम्यान अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडून आपल्या राष्ट्रवादीची भरती करायचे काम सुरू ठेवले आहे.
JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
शरद पवारांच्या पक्षात भाजप, शिवसेना किंवा बाकीच्या कुठल्या पक्षातले कार्यकर्ते येतात असे फारसे घडत नाही. त्यामुळे पवार काका – पुतण्यांच्या पक्षात ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात एवढेच घडत असते. परंतु मराठी माध्यमे त्याचे वर्णन “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी खेळी केली” वगैरे शब्द फुलोऱ्यांनी यांनी करत असतात. पुण्यात समाजवादी पार्टीच्या बाबतीतही यापेक्षा फारसे काही वेगळे घडले नाही. त्या पार्टीत मुस्लिम विचारसरणीच्याच एआयएमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याची बातमी मराठी माध्यमांनी फुलवून दिली.तयार,मयबषयथधभ
महाविकास आघाडीने मुंबईतली शिवाजीनगर मानखुर्दची विधानसभेचे एकमेव जागा अबू असीम आदमी यांच्यासाठी सोडायचे ठरवल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे, पण महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रातल्या 12 जागा मागून त्या आघाडीत समाविष्ट होण्याचा समाजवादी पार्टीचा विचार असल्याचे आजमी यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. त्यावर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App