अहमदनगर हादरले, ट्यूशनमध्ये शाळकरी मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न, शिक्षिकेसह 5 जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : राहुरीच्या उंबरे गावात ट्यूशनच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी दोन शालेय मुलींच्या तक्रारीनुसार या घटनेतील आरोपींची संख्या 8 असून पैकी 5 जणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर गावात दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. फूस लावणाऱ्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर गेल्या 4 दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.Ahmednagar shaken, attempt to convert schoolgirls in tuition, 5 arrested including teacher

उंबरे तालुका राहुरी येथील धर्मांतर करण्याचा प्रयत्नासारख्या गंभीर घटनेचा विषय शुक्रवारी विधान परिषदेत चर्चेला आल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.



काय आहे प्रकरण?

राहुरी तालुक्यातील उंबरे गावात मुस्लिम समाजातील हिना शेख हिने 3 वर्षांपासून गावात खासगी क्लास सुरू केले होते. या क्लाससाठी येणाऱ्या सातवी-आठवी वर्गातील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा तसेच मुस्लिम तरुणांशी ओळख वाढवण्याचा सल्ला शिक्षिका हिना शेख देत होती. 26 जुलै रोजी पहिल्यांदा हा प्रकार समोर आला. त्यानंतर गावात दोन गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश्य परिस्थिती झाली होती.

पोलिसांनी गांभीर्य ओळखून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यामुळे तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली. त्यानंतर पहिल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून या घटनेतील आरोपी आवेज निसार शेख व कैफ जिलानी शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कैफ शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून आवेज शेख हा नगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या घटनेतील उंबरेतील शिक्षिका हिना मुश्ताक शेख हिला शुक्रवारी रात्री, तर सलीम शेख या आरोपीस शनिवारी दुपारी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

या घटनेचा तपास अप्पर पोलिस अधिक्षका स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे, उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

5 आरोपींना अटक ​​​​​​

ट्यूशनला येणाऱ्या अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व मदत करणाऱ्या आठ आरोपींपैकी अल्ताफ शेख, कैफ शेख, शाकीर शेख, हिना शेख व सलिम शेख या 5 जणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण नगर येथे उपचार घेत आहे. तर एक जण अद्याप फरार असून एक अल्पवयीन मुलीचा आरोपीत समावेश आहे.

Ahmednagar shaken, attempt to convert schoolgirls in tuition, 5 arrested including teacher

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात