वृत्तसंस्था
अहमदाबाद : अहमदाबाद मध्ये सन 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तब्बल 38 आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे.Ahmedabad serial bomb blast
अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमित पटेल यांनी दहशतवाद प्रतिबंधक युएपीए कायद्याखाली 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादच्या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 56 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 2002मध्ये गोधरा कांड आणि दंगल घडल्यानंतर त्याचा सूड उगवण्यासाठी जम्मू काश्मीर मधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी अहमदाबाद मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
आज तब्बल 13 वर्षानंतर आज प्रत्यक्षात 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यातून 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App