मतदानापूर्वीच भाजपने लोकसभेची ‘ही’ जागा जिंकली! जाणून घ्या, नेमकं कारण आणि कोणता मतदारसंघ आहे
विशेष प्रतिनिधी
सुरत : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय गोंधळाचे वातावरण आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सात टप्प्यातील या निवडणुकीचा निकाल 04 जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने आधीच एक जागा जिंकली आहे. मतदानापूर्वीच भाजपने जिंकलेली ही जागा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. गुजरातमधील सुरतची जागा भाजपने जिंकली आहे. येथून खासदार म्हणून भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरत लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामाची परिस्थिती होती. येथे काँग्रेसचे उमेदवार निवेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजपने आक्षेप नोंदवला होता. काल म्हणजेच रविवारी झालेल्या सुनावणीदरम्यान काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर आज म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्यात आला.
काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म फेटाळल्यानंतर 9 उमेदवार रिंगणात राहिले होते, त्यापैकी बसपचे उमेदवार प्यारेलाल भारती आणि इतर 8 अपक्ष उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली आणि भाजपचे मुकेश दलाल न लढता निवडणूक जिंकले. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत उमेदवार बिनविरोध विजयी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेले भाजपचे पहिले उमेदवार आहेत आणि लोकसभा निवडणूक बिनविरोध जिंकणारे ते देशातील 29 वे उमेदवार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App