कॅप्टन साहेबच बंडाच्या पवित्र्यात; अमरिंदर सिंगांनी आधीच बोलविली काँग्रेस आमदारांची बैठक

वृत्तसंस्था

चंदीगड : जो राजकीय निरीक्षकांचा होरा होता तसेच घडले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात बंड होत असताना ते स्वतः बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सायंकाळी बैठक होत आहे. परंतु त्यापूर्वीच आज शनिवारी दुपारी दोन वाजता कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीच काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.Ahead of the CLP meeting today, Punjab CM Captain Amarinder Singh calls a meeting of party MLAs at 2 pm: Sources

नेमका हाच कॅप्टन साहेबांचा बंडाचा पवित्रा आहे. कॅप्टन साहेबांबरोबर जेवढे आमदार बैठकीला असतील त्यातूनच त्यांची राजकीय ताकद सिद्ध होईल. अशा स्थितीत काँग्रेसच्या अधिकृत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला नेमके कोण उपस्थित राहणार आहे?, किती आमदार तेथे उपस्थित राहून कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आवाज उठवतील? वगैरे प्रश्न तयार झाले आहेत.



काँग्रेसची विधीमंडळ पक्षाची बैठक अधिकृतरित्या सायंकाळी बोलवण्यात आली असली तरी दुपारीच आमदारांची बैठक घेऊन कॅप्टन साहेब राजकीय धमाका करणार आहेत. त्यांचे स्वतःचे मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षश्रेष्ठी घालवणार असतील तर काँग्रेसचीच सत्ता पंजाब मधून उखडून टाकण्याचा कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा या बैठकीतून मनसुबा स्पष्ट होत आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर काँग्रेसचे नेमके किती आमदार दुपारच्या बैठकीला असतील यावर त्यांची पुढची खेळी अवलंबून असणार आहे. काँग्रेसचे सुमारे 40 आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बरोबर असल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ उर्वरित 60 पेक्षा जास्त आमदार कॅप्टन साहेबांबरोबर असतील तर पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडणे अपरिहार्य आहे. त्याच बरोबर पंजाब मधून काँग्रेसची सत्ता जाणेही अपरिहार्य आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग आता इरेला पेटले असून ते पक्षश्रेष्ठींना आपली आमदारांची ताकद दाखवून देण्याच्या स्थितीत येऊन ठेपले आहेत. म्हणूनच त्यांनी येत्या तासाभरातच राजकीय सोक्षमोक्ष लावण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

Ahead of the CLP meeting today, Punjab CM Captain Amarinder Singh calls a meeting of party MLAs at 2 pm: Sources

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात