वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्निवीरांना 23 व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. Agnipath Scheme Firefighters will get free treatment even after retirement
– अग्निवीर योजनेसाठी 2 लाख अर्ज
भरती सुरू झाल्यावर केवळ 6 दिवसांत हवाई दलाकडे तब्बल 2 लाखांहून जास्त तरुणांनी अर्ज केले. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी एका नव्या सवलतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या आणि दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्निवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून 4 वर्षांनी मुक्त केले जाणाऱ्या या 75 % तरूणांना 11.71 लाख रूपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मोफत उपचार असतील असेही स्पष्ट केले आहे.
संबंधित अग्निवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रूग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमीझाल्यास 15 लाखांपासून 44 लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App