वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील सैन्य शक्तीचे आधुनिकीकरण आणि युवकांना देशसेवेची संधी देण्याच्या दृष्टीने केंद्रातल्या संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजना तयार केली असून युवकांना 4 वर्षांसाठी अग्निवीर म्हणून देशातील सैन्यदलामध्ये सेवा करण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे.Agneepath Yojana: Priority to firefighters who have completed 4 years of service in Central Police Force, Assam Rifles !!; An important decision of the Ministry of Home Affairs
आता त्यापलिकडे जाऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे अग्निवीर चार वर्षे सेवा पूर्ण करून बाहेर पडताना त्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफ आणि आसाम रायफल्स या सेवांमध्ये समाविष्ट करून घेण्यास प्राधान्य देण्याची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. यातून सीएपीएफ आणि आसाम रायफल्स यांना प्रशिक्षित युवक सैन्याचा लाभ होणार आहे.
अग्निपथ – अग्निवीर या संदर्भातली संपूर्ण योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांनी जाहीर केली आहे. या योजनेच्या सुरुवातीला तब्बल 45 हजार युवकांची भरती अग्निवीर म्हणून करण्यात येणार आहे यानंतर टप्प्याटप्प्याने भरतीची संख्या वाढवली जाईल.
अग्निपथ योजनेतून अग्निवीरांसाठी 4 वर्षांसाठी सुरुवातीची भरती करून त्यानंतर त्यांना आपल्या जीवनात सेटल होण्यासाठी भारतीय सैन्यदल मदत करीत यासाठी सुरुवातीचे दरमहा वेतन 30 हजार रुपये असून चार वर्षानंतर 40 हजार रुपये करण्यात येईल. तसेच सरकार आपली रक्कम टाकून 4 वर्षांनंतर सैन्य सेवेतून बाहेर पडणाऱ्या युवकांना एकूण 10 लाख रुपयांची रक्कम हातात देईल.
#AgnipathScheme | Ministry of Home Affairs (MHA) has decided to give priority to Agniveers, who successfully complete their 4 years of service, in getting recruitment to Central Armed Police Forces (CAPF) and Assam Rifles: HMO pic.twitter.com/iqTFv8W3Su — ANI (@ANI) June 15, 2022
#AgnipathScheme | Ministry of Home Affairs (MHA) has decided to give priority to Agniveers, who successfully complete their 4 years of service, in getting recruitment to Central Armed Police Forces (CAPF) and Assam Rifles: HMO pic.twitter.com/iqTFv8W3Su
— ANI (@ANI) June 15, 2022
अग्निवीरांच्या 4 वर्षांच्या सेवेनंतर त्यांचे मूल्यमापन करून त्यांना दीर्घकाळ म्हणजे 15 वर्षे सेवेची संधी देखील उपलब्ध होऊ शकेल. 4 वर्षे सेवा केलेल्या अग्निवीरांना पेन्शन मिळणार नाही. परंतु दरमहा 4 वर्षे वेतन आणि 4 वर्षाच्या अखेरीस एकरकमी 10 लाख रुपये असे हे पॅकेज असणार आहे.
अग्निवीरांना सैन्यदलाच्या विविध कामांचे प्रशिक्षण संरक्षण मंत्रालय देणार आहे. यामध्ये सेवा निधी पॅकेज बरोबर दुर्घटना पॅकेज याचा देखील समावेश आहे.
अग्निपथ योजनेतून अग्निवीरांना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कौशल्य विकसन आणि प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध असणार आहे. यातून नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन भारतीय सैन्य दलाला उत्तम दर्जाच्या प्रशिक्षण प्रशिक्षित सैन्याची सेवा उपलब्ध होणार आहे.
अग्निपथ योजनेतून भारतीय सैन्य दलाचे वयाचे प्रोफाईल देखील बदलणार असून ते 32 ऐवजी 26 होणार आहे. सैन्यदलाला जास्तीत जास्त तरुण अधिकाऱ्यांची गरज आहे या योजनेतून भागवली जाणार आहे.
माजी अधिकाऱ्यांचे टीकास्त्र
अग्निपथ योजनेवर काही माजी सैन्यदल अधिकाऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. या योजनेमुळे सैन्यदलामध्ये लवकरात लवकर सैनिकांना निवृत्त केले जाईल आणि त्यांचे भवितव्य धोक्यात येईल, असे काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.
गृह मंत्रालयाची योजना
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेली योजना अधिक महत्त्वाची आहे. अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात 4 वर्षे सेवा बजावल्यानंतर संबंधित युवक केवळ बाहेरच्या जगात नोकरी आणि रोजगार शोधत बसणार नाही, तर त्याऐवजी त्याला केंद्रीय राखीव पोलीस दल आणि आसाम रायफल्स या सारख्या सैन्यदलाशीच संलग्न असणाऱ्या सेवांमध्ये समाविष्ट करण्याची संधी देण्याची ही योजना आहे. यामुळे जे 75 % अग्निवीर 4 वर्षानंतर सेवेतून बाहेर पडण्याचा धोका माजी लष्करी अधिकारी व्यक्त करत आहेत, त्यांचे प्रमाण खूपच कमी होऊन त्या युवकांना प्राधान्याने सीएपीएफ आणि आसाम रायफल्स यांच्यासारख्या सेवांमध्ये संधी दिल्याने या दोन्ही सेवांची युवक सैन्यदलाची ताकद देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App