बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची केली मागणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. यानंतर आता सर्वच विरोधी पक्षांकडून ‘ईव्हीएम’वर प्रश्न उपस्थित करण्याचे सत्र सुरू झाले आहे. After the victory of BJP in three states now the opposition parties are starting to doubt the EVM
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सामना मुखपत्रातून प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, कमलनाथ, शिवसेना नेते संजय राऊत आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपापल्या शैलीत प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणतात की ते 2003 पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करत आहेत. चिप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. लोकशाही हॅकर्सवर नियंत्रण ठेवू शकते का? हा मूलभूत प्रश्न असून तो सर्व पक्षांना सोडवावा लागेल. प्रश्न असाही आहे की निवडणूक आयोग, सर्वोच न्यायालय तुम्ही कृपया आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App