विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA च्या बैठकीनंतर माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नेमकी तस्वीर टिपली!! ती वेगवेगळ्या माध्यमांनी आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर आवर्जून शेअर केली. After the NDA meeting, the media captured Modi-Yogi’s meeting
वास्तविक पाहता नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या यांच्या नेहमीच भेटी होत राहिल्या, पण आजची भेट मात्र वेगळी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची NDA आघाडीच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार, पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान जतीन राम मांझी यांच्यासारखे घटक पक्षांचे नेते हजर होते. या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन केले बैठकीमध्ये नरेंद्र मोदींचे भाषण झाले आणि त्यानंतर बाकीच्या नेत्यांनी पुढे येऊन मोदींचे अभिनंदन केले.
यामध्ये योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस या नेत्यांचाही समावेश होता. योगी आदित्यनाथ ज्यावेळी पुष्पगुच्छ देऊन समोर आले, त्यावेळी मोदींनी तो पुष्पगुच्छ स्वीकारलाच, त्याचबरोबर योगी नमस्कारासाठी वाकले, तेव्हा मोदींनी त्यांच्या स्टाईलने योगी आदित्यनाथ यांच्या पाठीवर थाप मारून विशेष ममत्व दाखवले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश कडून चांगल्या जागांची भाजपला अपेक्षा होती. 2019 मध्ये उत्तर प्रदेशने 63 खासदार निवडून दिल्यामुळे भाजपची खासदार संख्या 3003 झाली होती. परंतु, 2024 च्या निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपच्या संख्येत मोठी घसरण झाली आणि तिथे भाजपचे फक्त 34 खासदार निवडून आले. भाजपच्या या खराब कामगिरी मागे मोदी आणि योगी यांच्यातला राजकीय बेबनाव असल्याचे नॅरेटिव्ह माध्यमांनी चालविले होते. या पार्श्वभूमीवर मोदी आणि योगी यांची संसदेच्या संविधान सभागृहात भेट झाली. त्याची तस्वीर माध्यमाने नेमकेपणाने टिपली. ती वेगवेगळ्या सोशल हॅण्डल मीडियावर आवर्जून शेअर केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App