काँग्रेसवर संकटाचे गहिरे वादळ; सचिन पायलटांची पुन्हा बंडखोरी; 11 एप्रिलला अशोक गेहलोत सरकार विरुद्ध उपोषण

वृत्तसंस्था

जयपूर : एकीकडे काँग्रेसला दक्षिण भारतात गळती लागून राजकीय भगदाड पडले असताना दुसरीकडे ज्या राज्यात आता महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे, त्या राजस्थानमध्ये सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरीच्या पवित्र्यात उभे राहिले आहेत. राजस्थान मधल्या अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारविरुद्ध ते 11 एप्रिलला उपोषण करणार आहेत. After south rebellion Congress in deep trouble in north, sachin pilot announced one day fast against ashok Gehlot government in rajasthan

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होताना जनतेला जी भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची कमिटमेंट दिली होती, ती कमिटमेंट अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच आपण 11 एप्रिलला सरकारविरुद्ध उपोषण करणार आहोत, असे त्यांनी सचिन पायलट यांनी जाहीर केले आहेत.

राजस्थानात 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. पण त्यावेळी काँग्रेस हायमांडणे सचिन पायलट या तरुण नेतृत्वाकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्याऐवजी अशोक गेहलोत या जुन्याच नेतृत्वाकडे मुख्यमंत्रीपद दिले. तेव्हापासून सचिन पायलट अशोक गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. सचिन पायलट यांनी आत्तापर्यंत अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध थेट बंडखोरीचे असे दोन प्रयत्न केले आहेत. परंतु दोन्ही वेळेस काँग्रेस हायकमांडला पटविण्यात अशोक गेहलोत यशस्वी ठरले. सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये रोखण्यातही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यश आले.

पण गेहलोत पायलट यांच्यातील दिलजमाई फार काळ टिकली नाही. आता ज्यावेळी राजस्थान विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याचवेळी सचिन पायलट यांना 2018 मधली काँग्रेसची भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची कमिटमेंट आठवली आहे आणि ते अशोक गेहलोत सरकार विरुद्ध 11 एप्रिल ला उपोषण करणार आहेत. या उपोषण उपक्रमात त्यांच्याबरोबर राजस्थान मधले काँग्रेसचे किती आमदार सहभागी होतात यावर त्यांच्या बंडाची तीव्रता ठरणार आहे.

बंडखोरीचे वारे दक्षिणेतून उत्तरेत

सचिन पायलट यांचे अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकार विरुद्ध उपोषण हे काँग्रेसचे सध्याचे एकमेव राजकीय संकट नाही. काँग्रेस मधली ताजी बंडखोरी खरी दक्षिणेतून उफाळून आली आहे. माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी, अखंड आंध्र प्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजेगोपालाचारी यांचे पणतू सी. के. केशवन या तीन दक्षिणेतल्या महत्त्वाच्या नेत्यांनी गेल्या तीन दिवसांमध्ये काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात धरले आहे आणि त्या पाठोपाठ आज चौथ्या दिवशी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी आपल्याच काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात उपोषण जाहीर केले आहे. दक्षिणेतून सुरू झालेले काँग्रेस मधले हे संकटाचे वादळ उत्तरेकडे येताना अधिक गहिरे झाले आहे.

After south rebellion Congress in deep trouble in north, sachin pilot announced one day fast against ashok Gehlot government in rajasthan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात