पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर रशियाने युक्रेनवर आण्विक हल्ल्याची योजना थांबवली होती!

After PM Modis intervention Russia stopped the plan of nuclear attack on Ukraine

अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला दावा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरूच आहे. या युद्धाबाबत एक माहिती समोर आली आहे. 2022 च्या अखेरीस रशियाकडून युक्रेनवर आण्विक हल्ल्याची योजना तयार करण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे. हा हल्ला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर काही देशांच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. After PM Modis intervention Russia stopped the plan of nuclear attack on Ukraine

एका अहवालात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत दावा करण्यात आला आहे की, 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही देशांच्या नेत्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून युक्रेनमधील अणुहल्ला थांबवण्यात मोठी भूमिका बजावली होती.

रिपोर्टनुसार, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे या प्रकरणामुळे खूप चिंतेत होते. त्यावेळी रशियाकडून युक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सामरिक किंवा अण्वस्त्रांचा वापर होत होता. याबाबत अमेरिकेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. आणि सर्वांच्या मदतीमुळे हे भयंकर संकट टाळण्यास मदत झाली.


जो बायडेन यांच्या मुलाची वेश्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी, नाही दिला टॅक्स; 17 वर्षांचा तुरुंगवास शक्य


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाच्या या हालचालीची माहिती 2022 च्या शेवटी मिळाली होती. त्या वेळी, युक्रेनियन सैन्याने दक्षिणेकडील रशियन-व्याप्त खेरसनवर सतत पुढे जात होत्या. अशा प्रकारे त्याने संपूर्ण रशियाला वेढा घातला. दोन्ही देशांमधील खेरसनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अण्वस्त्रांच्या वापराला प्रोत्साहन मिळू नये, अशी चर्चा अमेरिकन सरकारमध्ये होती. यानंतर अमेरिकेने भारतासह ग्लोबल साउथच्या इतर देशांची मदत घेतली.

एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या विनंतीनंतर भारत आणि चीनसह इतर देशांनी रशियाशी संपर्क साधला. यामुळे दबाव वाढला. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धाच्या बाबतीत भारताने नेहमीच नागरिकांच्या हत्येचा निषेध केला आहे. युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. उझबेकिस्तान एससीओ शिखर परिषदेत मोदींनी पुतीन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही.

After PM Modis intervention Russia stopped the plan of nuclear attack on Ukraine

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात