विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांनी गुलाम नबी आझाद बाहेर आले आणि बोलले, बरे झाले सुटलो. राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!After many days Azad came out and spoke; Well done, I am not among those who follow Rahul Gandhi!!
काँग्रेस मधून बाहेर पडलेले वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्र “आझाद” लवकरच प्रकाशित होत आहे. या निमित्ताने त्याच्या प्रमोशनसाठी त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीतून आझादांनी बरेच जुने विषय पुन्हा एकदा समोर आणले आहेत.
पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने
त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती देखील केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे कितीही तात्विक मतभेद असले तरी त्यांनी माझ्याशी कधीही सूडभावानेने वर्तणूक ठेवली नाही. ते उदार आहेत. सूडबुद्धीने न वागणे हे त्यांचे मोठेपण आहे, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींवर स्तुती सुमने उधळली आहेत.
जी 23 मधील सहकाऱ्यांवर टीका
त्याचवेळी आझाद यांनी आपल्या g23 मधील जुन्या सहकाऱ्यांवर देखील टीका टिपण्णी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत ज्यावेळी जम्मू-काश्मीर मधले 370 कलम हटविण्याची घोषणा केली, त्यावेळी मी माझा इयरफोन काढून टाकला आणि ताबडतोब सभागृहाच्या वेलमध्ये येऊन सरकारच्या घोषणेचा प्रचंड विरोध सुरू केला. मी त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. जयराम रमेश हे पक्षाचे प्रतोद होते. पण बाकीचे सदस्य माझ्याबरोबर वेलमध्ये आले असताना जयराम रमेश मात्र आपल्या जागेवर बसून राहिले. ते 370 कलम हटवण्याच्या विरोधात सरकारच्या निषेधासाठी उभे राहिले नाहीत, असा दावा आझाद यांनी केला आहे.
राहुल गांधींमागे फिरणे आयोग्य
त्याच वेळी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला देखील सोडलेले नाही. राहुल गांधींनी देशातल्या सर्व मोदींचा केलेला अपमान आणि त्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्य रद्द होणे या पार्श्वभूमीवर त्यांना सुरत कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या. या चकरांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष वगैरे सगळे सामील झाले. त्यावर टीकास्त्र सोडताना आझाद म्हणाले, की बरे झाले मी आता काँग्रेसमध्ये नाही. मी सुटलो. राहुल गांधींच्या मागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!! अर्थात राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर आझाद यांनी टीका केली. राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचे काहीही कारण नव्हते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पण त्याचवेळी राहुल गांधी यांच्या पाठीमागे राज्यांचे मुख्यमंत्री आपापली कामे सोडून आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे अध्यक्ष, प्रदेशांमध्ये नेते फिरताना दिसले हे चित्र योग्य नसल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीतील विजय हायकमांडचा नव्हे
या देशात 2014 नंतर एकही निवडणूक अशी नाही की जिथे काँग्रेसचा विजय झाला तर त्याचे श्रेय केंद्रीय नेतृत्वाने घ्यावे!! वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसला जो विजय मिळाला तो विजय स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ होते, असे परखड उद्गारही गुलाब नबी आझाद यांनी काढले आहेत.
आणखी किती फटाके फुटणार?
त्यांच्या “आझाद” या आत्मचरित्राचे लोकार्पण जम्मू काश्मीर रियासतीचे माजी राजे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वीच आझाद यांनी बऱ्याच दिवसांनी राजकीय फटाके फोडले आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष लोकार्पणाच्या कार्यक्रमात करण सिंह आणि स्वतः आझाद आणि त्यावेळी उपस्थित असणारे अन्य नेते कोणकोणते राजकीय फटाके फोडतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App