विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील सरकारी शाळांमधील सुट्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागानुसार, सामान्य आणि उर्दू शाळांसाठी सुट्टीचे कॅलेंडर वेगळे आहे. सामान्य शाळांमध्ये हिंदू सणांना आणि उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदच्या दिवशी अतिरिक्त सुट्टीची तरतूद करण्यात आली असल्याचं सांगितलं आहेAfter criticism started over school holidays the Bihar Education Department clarified
महाशिवरात्री, वसंत पंचमी, जन्माष्टमी, रामनवमी आणि चित्रगुप्त पूजेला सर्वसाधारण शाळांना अतिरिक्त पाच सुट्या देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदला प्रत्येकी तीन दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे.
विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी शिक्षण विभागाने शाळांना सुटी देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. नवीन कॅलेंडरनुसार जन्माष्टमी, रक्षाबंधन, रामनवमी, शिवरात्री, तीज, वसंत पंचमीच्या सुट्या कमी करण्यात आल्या आहेत, तर ईद आणि बकरीदच्या सुट्ट्या प्रत्येकी ३ दिवस करण्यात आल्या आहेत.
हे कॅलेंडर समोर आल्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हिंदूंच्या सणांच्या सुट्या कमी करून मुस्लिमांच्या सणांच्या सुट्या वाढवल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी नितीश सरकारला धारेवर धरले होते. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी हिंदूविरोधी मानसिकता असलेला आणि हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. हिंदूंच्या सर्व सणांच्या सुट्ट्या रद्द करून मुस्लिम सणांच्या सुट्या वाढवण्यात आल्या. हे आम्ही कधीही मान्य करणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App