प्रतिनिधी
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी बांधून त्यांची पोस्टर्स ठिकठिकाणी झळकवली. आता त्यापुढे जाऊन राष्ट्रवादीच्या एका आमदाराने चक्क अजित दादांना मुख्यमंत्री करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे. अजित दादा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत भविष्यकाळात वाढदिवस साजरा करणार नाही, अशी शपथ चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी वाहिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही शपथ वाहिली. After Ajit Dada’s CM poster, now MLA’s Bhishma Pratigya
आमदार राजेश पाटील यांनी यंदाचा 2023 चा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. पण भविष्यात मात्र अजित दादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी प्रतिज्ञा घेतली.
राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत किमान तीन मुख्यमंत्री पोस्टर्सवर लावले आहेत. यामध्ये अर्थातच अजित दादा इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. पण अजित दादा यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील पोस्टर्स वरचे मुख्यमंत्री झाले आहेत. राजेश पाटलांनी अजित दादांना मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा घेतानाच महाविकास आघाडी मात्र टिकली पाहिजे, अशी भूमिकाही जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App