वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानंतर दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. या भूकंपात मालमता अथवा जीवितहानीचे वृत्त नसून हा भूकंप मध्यम तीव्रतेचा होता. After Afghanistan, Delhi, Noida, Jammu and Kashmir was shaken by the earthquake
दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रहिवाशांनी भूकंपाबद्दल ट्विट केले. अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा प्रदेशात केंद्रबिंदू असलेल्या ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर आज सकाळी राज्यातील शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशातील नोएडातील काही रहिवाशांनी ट्विट केले की, किमान २० सेकंद जमीन हादरली. दिल्लीतील लोकांनीही ट्विट केले की त्यांना हादरा जाणवला.
“मला वाटले माझे डोके फिरत आहे आणि अचानक मी पंख्याकडे पाहिले आणि मला भूकंपाचे धक्के जाणवले. नोएडामध्ये सुमारे २५-३० सेकंदांपर्यंत जोरदार हादरे जाणवले,” असे ट्विट शशांक सिंग या दिल्ली शेजारील शहरातील रहिवाशाने केले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विट केले की, अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा प्रदेशात सकाळी ९:४५ वाजता ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र १८१ किमी होत, असे त्यात म्हटले आहे. या भूकंपात मालमत्तेचे नुकसान, जखमी किंवा मृत्यूचे कोणतेही वृत्त नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App