कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी बिघडल्याने व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, भारताने ब्राझीलला मागे टाकत आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 15 वर्षांनंतर भारताने ब्राझीलला मागे टाकून अरब देशांना अन्नधान्य निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी अरब-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सने ही आकडेवारी दिली आहे.After 15 years India left Brazil behind, became number one in exporting food grains to Arab countries
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी बिघडल्याने व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, भारताने ब्राझीलला मागे टाकत आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 15 वर्षांनंतर भारताने ब्राझीलला मागे टाकून अरब देशांना अन्नधान्य निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी अरब-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सने ही आकडेवारी दिली आहे.अरब देशांसाठी ब्राझील हा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे, परंतु कोरोना महामारीमुळे दोन्ही देशांमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
आकडेवारीनुसार, अरब देशांना रसद पुरवणाऱ्या 22 देशांपैकी ब्राझीलची निर्यात 8.15 टक्के होती, परंतु भारताने 8.25 टक्के बाजारपेठ काबीज केली आणि गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच अरब देशांना सर्वात मोठा अन्न निर्यात करणारा देश बनला.
भारत, तुर्कस्तान, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना यांसारख्या पारंपारिक शिपिंग मार्गांमधील व्यत्ययांमुळे ब्राझीलने आपले स्थान गमावले. याचा फायदा भारताला मिळाला. अहवालानुसार, ब्राझीलला आता अरब देशांना अन्नधान्य निर्यात करण्यासाठी 30 ऐवजी 60 दिवस लागतात, तर भारत आपल्या भौगोलिक स्थितीमुळे अरब देशांना कमीत कमी वेळेत अन्नधान्य पुरवण्यात यशस्वी ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App