प्रतिनिधी
नवी दिल्ली : लव्ह जिहाद मधून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब अमिन पुनावाला ज्याच्याबद्दल दररोज वेगवेगळे धक्कादाय खुलासे होत असून आफताब याचा वालकर परिवाराच्या मालमत्तेवर डोळा होता असा धक्कादाय खुलासा श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केला आहे आफताब याने श्रद्धा कडे कायमच धर्मांतर करण्याच्या दृष्टीनेच पाहिले त्याने तिला मारून तिचे 35 तुकडे केले माझ्या हातात शिक्षा करणे असते, तर मी त्याचे 70 तुकडे केले असते, असे संतप्त उद्गार विकास वालकर यांनी काढले आहेत. Aftab had an eye on the property of shraddha’s
श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला सध्या कोठडीत आहे. अशातच आता श्रद्धाच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. श्रद्धाचे वडील विकास वालकर हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबर दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात केसच्या कामासाठी आले आहेत.
दिल्ली: श्रद्धा वाकर के पिता विकास वाकर भाजपा नेता किरीट सोमैया के साथ दिल्ली पुलिस मुख्यालय पहुंचे। pic.twitter.com/Cmz5vIcKaE — ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2022
दिल्ली: श्रद्धा वाकर के पिता विकास वाकर भाजपा नेता किरीट सोमैया के साथ दिल्ली पुलिस मुख्यालय पहुंचे। pic.twitter.com/Cmz5vIcKaE
— ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2022
मालमत्तेवर आफताबची नजर होती
आफताबने नियोजन करून श्रद्धाची हत्या केल्याचे विकास वालकर यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आफताबने माझ्या मुलीचा ब्रेनवॉश केला. त्याची आमच्या मालमत्तेवर नजर होती, असा धक्कादायक खुलासाही विकास वालकर यांनी मुलाखतीत केला आहे. आफताबशी मैत्री झाल्यावर श्रद्धाने आमच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली होती. आफताबने श्रद्धाकडे धर्माच्या नजरेतून पाहिले होते. आफताबशी मैत्री झाल्यानंतर आमची सर्वसामान्य मुलगी आमच्याशी संपत्तीवरून वाद घालत होती असेही त्यांनी सांगितले.
आफताबचे ७० तुकडे करावेत…
आफताबला त्याने केलेल्या कृत्याबद्दल काहीही पश्चाताप वाटत नाही आणि दुसरीकडे मला माझ्या मुलीसाठी मी काहीच करू शकलो नाही याचे वाईट वाटत आहे. त्याला बाहेरून कोणाचा तरी पाठिंबा असावा, असा आपला कयास असल्याचे विकास वालकर यांनी सांगितले. माझ्या हातात शिक्षा देण्याचा निर्णय असता तर माझ्या मुलीचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचे ७० तुकडे करावेत अशी शिक्षा दिली असती, असे संतप्त उद्गार विकास वालकर यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App