काबूल पडले; अशरफ घनी सरकारने शांततेत तालिबानकडे सत्ता सोपविली; अली अहमद जलाली हंगामी सरकारचे प्रमुख

वृत्तसंस्था

काबूल : काबूल शहर आणि परिसरात तालिबानचा सैनिकी मुकाबला करण्याची तयारी सुरुवातीला दाखविणाऱ्या अध्यक्ष अशरफ घनी सरकारने आता तालिबानपुढे शरणागती पत्करली असून तालिबानच्या सैन्याशी शांततापूर्ण सत्तांतराच्या वाटाघाटी सुरू आहेत. अली अहमद जलाली यांना तालिबानी हंगामी सरकारचे प्रमुख नेमण्यात आले असून त्यांच्याकडे सत्तांतर केले जात आहे.Afghan govt handing power to Taliban, Ali Ahamd Jalali to be appointed as new interim head

अब्दुल्ला अब्दुल्ला हे अशरफ घनी सरकार आणि तालिबान यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. सध्या सरकारी फौजांनी काबूलमधील कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे आवाहन मावळते अध्यक्ष अशरफ घनी यांनी केले आहे. खम्मा न्यूज एजन्सीने ही बातमी दिली आहे.


काबूल पडले; अशरफ घनी सरकारची शांततापूर्ण मार्गाने सत्ता तालिबानकडे सोपविण्याची तयारी

अफगाणिस्तानात रशिया हस्तक्षेप करणार नाही. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत अफगाणिस्तानात या विषयावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी रशियाच्या प्रतिनिधींनी केली आहे.तत्पूर्वी, तालिबानी सैन्य काबूलमध्ये घुसले. त्यांना प्रतिकार करण्यात आला नाही.

तालिबानचे प्रतिनिधी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादात सत्तांतराच्या वाटाघाटी करीत आहेत. अफगाणिस्तानमधील सत्तेतील सर्व महत्वाची पदे तालिबानने आपल्याकडे मागितली आहेत. आता आलेल्या ताज्या बातमीनुसार अली अहमद जलाली यांच्याकडे तालिबानच्या हंगामी सरकारचे प्रमुख पद देण्यात येत असून अशरफ घनी यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविली आहे. उर्वरित सत्ता पदांवर देखील तालिबानच्या वर्चस्वासह वाटाघाटी सुरू आहेत.

अशरफ घनी सरकारमधील अंतर्गत सुरक्षा मंत्री अब्दुल सत्तार मिरजकवाल यांनी शांततापूर्ण सत्तांतराची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट येणार असल्याचे पक्के झाले आहे.

काबूल मधून कोणत्याही नागरिकांनी पलायन करू नये. त्यांच्या जीवाला धोका नाही, असा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला आहे. काबूलमधील कोणत्याही परदेशी दूतावास अथवा कार्यालयास तालिबान धक्का लावणार नाही. तालिबानच्या राजवटी त्यांना धोका पोहोचणार नाही, अशी ग्वाही देखील तालिबानच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

अशरफ घनी यांच्या सरकारने शांततापूर्ण सत्तांतराची तयारी दाखवल्यानंतर तालिबानने काबूलवर हल्ला करायचा नाही, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर तालिबानच्या प्रतिनिधींनी काबूलमध्ये सत्तांतराच्या तयारीसाठी तसेच चर्चेसाठी अध्यक्ष अशरफ घनी यांची भेट घेतली. काबूलमध्ये सुरुवातीस तालिबानच्या फौजांचा मुकाबला करण्याची तयारी सुरू होती. परंतु, तालिबानच्या फौजांचा जोर आणि सरकारी फौजांमध्ये असलेला आत्मविश्वासाचा अभाव त्यामुळे अशरफ घनी सरकारने तालिबानपुढे शरणागती पत्करली.

Afghan govt handing power to Taliban, Ali Ahamd Jalali to be appointed as new interim head

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात