बहुचर्चित आणि आता तितकाच वादग्रस्त ठरत असलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवली आहे.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : १६ जून रोजी प्रदर्शित झालेला बहुचर्चित आणि आता तितकाच वादग्रस्त ठरत असलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवली आहे. चित्रपटाची कथा, चित्रपटातील संवाद यावर लोकांचे विशेषता हिंदू संघटनांचे खूप आक्षेप आहेत. या पार्श्वभूमीवर आता आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलणार असल्याची बातमी येत आहे. ते सुधारित केले जातील आणि या आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट केले जातील, असे सांगितले गेले आहे. दरम्यान मध्य प्रदेशात क्षत्रिय करणी सेनेने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक मनोज मुंतशीर यांना गंभीर धमकी देखील दिली आहे. Adipurush Controversy Kshatriya Karni Senas serious threat to Manoj Muntishar
आदिपुरुष या चित्रपटातील वादग्रस्त संवादांमुळे क्षत्रिय करणी सेनेत प्रचंड नाराजी आणि संताप दिसून येत आहे. त्यामुळे, क्षत्रिय करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक जिथे दिसेल, तिथेच मारले जाईल, अशी घोषणा केली आहे. ज्यासाठी करणी सेनेचे सदस्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा शोध घेत आहेत.
क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राज शेखावत यांनी राजगडमधील बिओरा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ट्रेलरच्या वेळीच आम्ही याला विरोध केला होता. असे असतानाही सेन्सॉर बोर्डाने त्याचे प्रदर्शन का होऊ दिले?
मनोज मुंतशीर यांना धमकी दिली –
तर दुसरीकडे राज्य क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष इंदरसिंग राणा यांनीही मनोज मुंतशीर यांना स्वतः डायलॉग म्हणत सांगितले की, शहर भी तेरा, घर भी तेरा, सिर भी तेरा और जूता रहेगा करणी सेना का.. . आम्ही लवकरच याचा हिशोब करू.
चित्रपटाचे संवाद बदलले जाणार आहेत –
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मनोज मुंतशीर यांनी चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ते सुधारित केले जातील आणि या आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट केले जातील. तुमच्या (लोकांच्या) भावनेपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचे काहीही नाही, असे त्यांनी लिहिले आहे. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचे दुःख कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकाने ठरवले आहे की, जे काही संवाद तुम्हाला दुखावत आहेत, आम्ही त्यात बदल करू आणि या आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट करू.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App