PM Modi मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला, ही बातमी जुनी; त्यांनी बिकानेर मधून चीनलाही ललकारले, ही बातमी नवी!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान मधल्या बिकानेर मधून पाकिस्तानला इशारा दिला ही बातमी आता जुनी झाली, पण त्यांनी तिथून चीनलाही ललकारले, ही बातमी खरी आणि नवी आहे. PM Modi

राजस्थान मधल्या बिकानेर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शिलान्यास आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आज झाला. “ऑपरेशन सिंदूरचा” पहिला टप्पा संपल्यानंतर ते पहिल्याच दौऱ्यात राजस्थान सीमेवर गेले. त्यावेळी तिथे केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला. जो लोग सिंदूर मिटाने आये थे, उन्हे हमने मिट्टी मे मिला दिया. मोदी का दिमाग ठंडा है लेकीन लहू गरम है. और अब मोदी कें रगों में लहू नहीं, गरम सिंदूर दौडता है. हम खून और पानी एकसाथ नहीं बहने देंगे, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या भाषणाच्या बातम्या सगळ्या माध्यमांनी रंगवून दिल्या.

पण त्या पलीकडे जाऊन पंतप्रधान मोदी जे बोलले त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मात्र माध्यमांचे दुर्लक्ष झाले. जिन्हे अपने हत्यारों पर नाज था, वह अब debris उनका मलबा ढूंढ रहे है!!, असे मोदी म्हणाले. आणि नेमका हाच पाकिस्तानच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या चीनला टोला होता. कारण ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने तुर्की ड्रोन आणि चिनी मिसाईल्स यांचाच वापर करून स्वतःच्या बचावाचा आणि भारतावर प्रतिआक्रमण करायचा प्रयत्न केला होता. पण भारताचे सगळे हल्ले एवढे अचूक आणि सटीक होते की भारताच्या हल्ल्यातून ना तुर्की ड्रोन वाचले, ना चिनी विमाने आणि मिसाईल्स वाचली, ना पाकिस्तानचे विमानतळ वाचले. भारताने सगळीकडे पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पण त्यापलीकडे जाऊन चिनी हत्यारांचा बनावट धाक आणि दम उघडा पाडला. चिनी हत्यारे पाकिस्तानच्या बचावाच्या उपयोगाची नाहीत, हे सिद्ध केले. पंतप्रधान मोदींनी बिकानेर मधल्या भाषणांमध्ये या सगळ्या गोष्टीचा फक्त एकाच वाक्यात उल्लेख केला. जिन्हे अपने हत्यारोंपर नाज था, वह debris में उनका मलबा ढूंढने में लगे हुऐ है, असा टोला मोदींनी चीनला हाणला.

त्यापलीकडे जाऊन मोदींनी operation sindoor च्या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीची hint दिली. एअर स्ट्राईक केल्यानंतर मी राजस्थानच्या वीरभूमीत आलो होतो. तसाच आज पुन्हा आलोय. Operation sindoor अजून थांबलेले नाही, असे मोदी म्हणाले.

डोवाल यांनी चीनला सुनावले होते

मोदींच्या या भाषणाचा धागा उचलून परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी चीन आणि तुर्की यांना पाकिस्तान संदर्भात आज गंभीर इशारा दिला. कुठल्याही देशांचे संबंध हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतात. त्यामुळे चीन आणि तुर्की या दोन्ही देशांनी पाकिस्तानला दहशतवादाला लगाम घालायला सांगावे. अन्यथा त्याचा बिमोड करायला भारत समर्थ आहे, असा इशारा परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिला. यासाठी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यातल्या 10 मे रोजी झालेल्या चर्चेचा हवाला दिला. डोवाल यांनी यी यांना स्पष्ट शब्दांत सुनावले होते, याची आठवण जयस्वाल यांनी करून दिली.

Addressing a public rally in Deshnoke, Bikaner, PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात