विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nadeem Khan बॉलिवूड विश्वाला हादरवणारी गंभीर घटना समोर आली असून धुरंधर चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नदीम खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलिसांनी कारवाई करत नदीम खानला अटक केली आहे. मनोरंजन विश्वाशी संबंधित व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.Nadeem Khan
मालाडच्या मालवणी परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार महिला ही अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करत होती. या काळात आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवून लग्नाचे खोटे आश्वासन दिले आणि त्याचा गैरफायदा घेत अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीनुसार, सन 2015 पासून नदीम खानने महिलेचा विश्वास संपादन करत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सुरुवातीच्या काळात महिलेला तक्रार करण्याची भीती वाटत होती. आरोपी प्रसिद्ध अभिनेता असल्याने समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने ती गप्प राहिली असल्याचेही तिने सांगितले आहे.Nadeem Khan
मात्र, कालांतराने आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि मानसिक छळ वाढवल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. सतत मानसिक दबाव, फसवणूक आणि शोषण सहन करावे लागत असल्याने न्याय मिळवण्यासाठी तिने धैर्याने तक्रार दाखल केली. महिलेच्या जबाबावरून मालवणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत नदीम खानला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तक्रारीतील बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही फसवले आहे का, किंवा यासंदर्भात आणखी काही तक्रारी पुढे येतात का, याची चौकशी केली जात आहे. मुंबई शहरात त्याच्या संपर्कात आलेल्या इतर महिलांचीही माहिती घेतली जात असून, संपूर्ण प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील पुढील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App