मणिपूर हिंसाचार प्रकरणी ‘CBI’चा अ‍ॅक्शन मोड; आतापर्यंत दहा आरोपींना अटक!

PM Modi Led Panel Decides Three Names For New CBI Chief

सामूहिक बलात्कारप्रकरणी नवीन एफआयआर नोंदवणार

विशेष प्रतिनिधी

इंफाळ :  मणिपूर हिंसाचार आणि कट रचल्याप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. सीबीआयने हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर नोंदवले आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. सामूहिक बलात्काराच्या (व्हायरल व्हिडिओ प्रकरण) प्रकरणी सीबीआय नवीन एफआयआर (सातवी एफआयआर) नोंदवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Action Mode of CBI in Manipur Violence Case Ten accused arrested so far

मणिपूरमध्ये ८६ दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना पहायला मिळत आहेत. दरम्यान, केंद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

गृह मंत्रालयाने आपले सचिव अजय कुमार भल्ला यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, या खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी मणिपूरबाहेर चालवण्याची विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र देण्याबरोबरच गृहमंत्रालयानेही राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांच्या प्रमुख प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. दोन्ही समुदायांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही समुदायांमध्ये सलोखा घडवून आणण्याबाबत मतं विभागली गेली असली तरी लवकरच या चर्चेत काही प्रगती होईल, अशी सरकारला आशा आहे.

Action Mode of CBI in Manipur Violence Case Ten accused arrested so far

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात