वृत्तसंस्था
बस्तर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.According to initial information, at least 9 more Naxals have been killed and around 15 others were injured in the encounter, says P Sundarraj, IG Bastar
पण त्याचवेळी ९ नक्षलवाद्यांना पोलीसांनी कंठस्नान घातले असून १५ नक्षलवादी जखमी झाले आहेत,अशी माहिती पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली आहे. जंगल परिसरात २५० नक्षलवाद्यांचा जमाव असून ते थांबून – थांबून गोळीबार करत असल्याचे सुंदरराज यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांच्या जमावाचा आकडा नेमका समजून येण्यासाठी पोलीस अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर करत असून त्यांचे लोकेशनही पक्के केल्यावर मोहीम आणखी तीव्र केली जाईल, अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.
तत्पूर्वी, या चकमकीत शहीद सैनिक 3 डीजीजी आणि 2 कोब्रा असल्याची माहिती दिली जात आहे. याचदरम्यान दोन नक्षलवाद्यांनाही यमसदनी पाठवण्यात आले आहे. यात एका महिला नक्षलवादीचाही समावेश आहे. विजापूरमधील टेकुलगुडा भागात ही चकमकी उडाली. जवान आणि नक्षलवाद्यांच्या बाजूने प्रचंड गोळीबार सुरू आहे.
दुसरीकडे, छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे नक्षलवादी जनमिलीशियाच्या एक लाखांचे इनाम असलेल्या कमांडरने आत्मसमर्पण केले आहे. घरवापसीच्या मोहिमेमुळे प्रभावित होऊन नक्षलवादी कमांडरने एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
According to initial information, at least 9 more Naxals have been killed and around 15 others were injured in the encounter. We will need more time to confirm this. As per our estimates, there were 250 Naxalites there: P Sundarraj, IG Bastar pic.twitter.com/28r5a6a8Z2 — ANI (@ANI) April 3, 2021
According to initial information, at least 9 more Naxals have been killed and around 15 others were injured in the encounter. We will need more time to confirm this. As per our estimates, there were 250 Naxalites there: P Sundarraj, IG Bastar pic.twitter.com/28r5a6a8Z2
— ANI (@ANI) April 3, 2021
खून, जाळपोळ, दरोडा, आयईडी स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तो सहभागी होता. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 88 इनामी नक्षलवाद्यांसह 328 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
यापूर्वी 23 मार्च रोजी छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षकाचे (डीआरजी) तीन जवान नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात शहीद झाले होते. या हल्ल्यात डीआरजीचे पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले
असून 10 जवान किरकोळ जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसला लक्ष्य केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसला धडक देताना शक्तिशाली आयईडी स्फोट झाला. कडनेर ते कन्हारगावदरम्यान डीआरजीचे 27 कर्मचारी जात असताना हा हल्ला झाला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App