वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील रहदारी हा विषय दिवसेंदिवस जटील बनू लागला आहे. त्यात वाढलेली वाहने ही मोठी समस्या आहे. आता रहदारीच्या आणि वाहतूक कोंडीच्या या समस्येवर मात करण्यासाठी पुण्यात दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात येत आहे. Accelerate tunneling work to clear traffic congestion in Pune
कोथरूड ते पंचवटी आणि पंचवटी ते गोखलेनगर असे दोन बोगदे तयार करण्याचे ठरविले आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी १ हजार ९० मीटर, तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी ५८० मीटर आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होणार आहे.
बोगद्यामुळे पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत होईल. तसेच सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी होणार आहे. पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर अशा दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, कोथरूड ते पाषाण हे अंतर चांदणी चौकमार्गे साडेआठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर हेच अंतर चार किलोमीटर होणार आहे. तर पाषाण रोड ते गोखलेनगर हे अंतर सव्वा चार किलोमीटर असून बोगदा झाल्यावर हेच अंतर २.९ किलोमीटर होणार आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी १ हजार ९० मीटर, तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी ५८० मीटर असेल. त्यामुळे वाहतुक कोंडी फुटणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App