Abu Azmi : अबू आजमींचा सकाळी राज ठाकरेंवर भडीमार; संध्याकाळी अयोध्येच्या खासदारांना घेऊन गाठले उद्धव ठाकरेंचे दार!!

Abu Azmi attacked Raj Thackeray in the morning

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अबू आजमींचा सकाळी राज ठाकरेंवर भडीमार; संध्याकाळी अयोध्येच्या खासदारांना घेऊन उद्धव ठाकरेंचे गाठले दार!!, समाजवादी पक्षाचे “असे” राजकारण आज मुंबईत रंगले. Abu Azmi attacked Raj Thackeray in the morning

समाजवादी पक्षाच्या 25 खासदारांचा सत्कार सोहळा अबू आजमींनी मुंबईत घेतला. त्याला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सगळ्या खासदारांनी महाराष्ट्रात समाजवादी पक्ष रुजवण्यासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. त्याच वेळी अबू आजमी हे राज ठाकरेंवर घसरले. उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका. उत्तर भारतीयांच्या गाड्या कोण फोडतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी गृहमंत्री होऊ द्या, मग बघतो तुमच्याकडे, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांना सकाळी दमबाजी केली.

समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे सन्मानपूर्वक विधानसभेच्या जागा मागितल्या. अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात 37 खासदार निवडून आणल्यानंतर महाराष्ट्राची राजकीय तहान लागली आहे. महाराष्ट्रात विशिष्ट मतांची टक्केवारी समाजवादी पार्टीने कमवली की त्यांचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण लोकसभेतील संख्याबळानुसार आज भाजप (240 खासदार) खालोखाल काँग्रेस (99 खासदार) आणि त्या खालोखाल समाजवादी पार्टीचा (37 खासदार) नंबर लागतो. त्यामुळे अखिलेश यादव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे.

खासदारांच्या सत्कार सोहळ्यात अयोध्येचे समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश प्रसाद पासी हे देखील सामील झाले होते. सकाळी राज ठाकरे यांच्यावर भडीमार करणाऱ्या अबू आजमींनी अवधेश प्रसाद पासी आणि धर्मेंद्र यादव यांना घेऊन सायंकाळी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीचे दार गाठले. अवधेश प्रसाद यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रासह देशात आरक्षणाचे राजकारण चालेल. धर्माचे राजकारण चालणार नाही, असे अवधेश प्रसाद पासी यांनी सांगितले.

अबू आजमी उद्या विशाळगडावर

सगळ्या समाजवादी पार्टीच्या खासदारांचा सत्कार करणारे अबू आजमी उद्या विशाळगडला भेट देणार आहेत.

Abu Azmi attacked Raj Thackeray in the morning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात