जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्लांचा INDI आघाडीला तगडा झटका, मेहबूबा मुफ्तींशी संबंध तोडले!!

Abdullah's hard blow to the INDI alliance in Jammu and Kashmir

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ने जुने मित्र नव्याने जोडले. चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देशम आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाशी युती केली. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका दौऱ्या पाठोपाठ भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये वेगळे चैतन्य पसरले.

कारण अब्दुल्ला परिवाराने INDI आघाडीला तगडा झटका देत मेहबूबा मुफ्ती यांच्याशी राजकीय संबंध तोडून टाकले. जम्मू विभागात काँग्रेसने लोकसभेच्या 2 जागा लढवाव्यात काश्मीर खोऱ्यातल्या 3 जागा अब्दुल्ला परिवाराची नॅशनल कॉन्फरन्स लढवेल असे फारूक अब्दुल यांनी परस्पर जाहीर केले, इतकेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, असे मत व्यक्त करून अखिलेश यादव, राहुल गांधी आदी नेत्यांना देखील झटका दिला.

पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी गुपकार ग्रुप मधल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना जबरदस्त धक्का दिला. अब्दुल्लांनी परस्पर काश्मीर खोऱ्यातल्या 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स लढवण्याची घोषणा करून मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी या पक्षाला आपल्या आघाडीतून परस्पर बाहेर काढून टाकले. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती चिडल्या. आत्तापर्यंत छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टी अब्दुल्ला परिवार आपल्याला सांगत होता, पण गुपकार आघाडी तोडायचा एवढा महत्त्वाचा निर्णय ज्यांनी परस्पर जाहीर केला. त्यामुळे पीडीपी पक्ष स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला मोकळा आहे, असे मेहबूबा मुक्ती म्हणाल्या.

अब्दुल्ला परिवाराने नॅशनल कॉन्फरन्स पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच NDA मध्ये दाखल केला नसला तरी गुपकार आघाडी तोडून त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एकतर्फी निवडणूक होण्याची शक्यता मावळून टाकून पंतप्रधान मोदींनाच अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळेच मेहबूबा मुक्ती यांची चिडचिड झाली आहे.

Abdullah’s hard blow to the INDI alliance in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात