तिरंगा यात्रा काढून आप देणार देशभक्तीचे पाठ, १४ सप्टेंबरला पोहोचणार अयोध्येत, विधानसभा निवडणुकांवर नजर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदूत्वाची नवी ओळख दाखवून देण्याबरोबरच देशभक्तीची नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १४ सप्टेंबरला ही यात्रा अयोध्येत पोहोचणार आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.AAP now plans Tiranga Yatra in Ayodhya, may halt at Ram temple,Eye on state elections

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा अयोध्येत राम लल्ला मंदिरात आणि हनुमानगढी येथे पोहोचणार आहे.आपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यास सुरू करण्यात आल आहे. घटनात्मक मूल्यांची शिकवण दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या विभाजनकारी राजकारणाला विरोाध म्हणून हिंदूत्वाची नवी ओळख आणि धर्म आणि राष्टवादाची खरी परिभाषा या यात्रेद्वारे दिली जाणार आहे.



आप सध्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंडच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. उत्तराखंडमध्ये माजी लष्करी अधिकारी कर्नल अजय कोथियाल आपचे मुख्यमंत्रिपदासाठीचे उमेदवार आहे. त्यांनी या डोंगरी राज्याला हिंदूंसाठी आध्यात्मिक राजधानी बनवण्याचे आश्वासन दिले आहे.

अयोध्या कार्यक्रमाबाबत सिंह म्हणाले, आप रविवारी आग्रा आणि १ सप्टेंबरला नोएडा येथे तिरंगा यात्रा काढणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून आपवर अल्पसंख्यांकांचे तृष्टीकरण केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आपने म्हटले राष्ट्रवादाची नवी परिभाषा ते जनतेसमोर मांडणार आहे. हिदंूत्वाला तिरंगा आणि सुशासनाबरोबरच चांगल्या शिक्षणाचीही जोड दिली जाणार आहे.

सिसोदिया आणि पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी सिंह दोन्ही मेळाव्यांना उपस्थित राहणार आहे. आपने दिल्लीमध्ये तब्बल ८५ कोटी रुपये खर्च करून संपूर्ण दिल्लीमध्ये ५०० हायमास्ट तिरंगा बसवित आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आप पुढील एका वर्षात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. भाजपचा तथाकथित राष्ट्रवाद भारताला कमजोर करत आहे.

आपचा असा विश्वास आहे की राष्ट्रवाद हा लोकांना त्यांचे अधिकार देण्याविषयी आहे. मग ते चांगले शिक्षण असो किंवा मजबूत आरोग्यसेवा. आपसाठी तिरंग्यावरील प्रेम देशासाठी, त्याच्या विकासासाठी आणि तेथील नागरिकांच्या कल्याणाच्या रूपात प्रकट होते, असेही सिंह यांनी सांगितले.पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी या मोहीमेची व्याप्ती वाढविली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ मतदारसंघात तिरंगा यात्रा काढणार आहे.

AAP now plans Tiranga Yatra in Ayodhya, may halt at Ram temple,Eye on state elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात