आम आदमी पक्षही झाला राममय! दिल्लीत शोभायात्रा अन् महाप्रसाद वाटप होणार

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्लीत मोठी घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी आम आदमी पार्टी दिल्लीत शोभायात्रा काढून महाप्रसाद(भंडारा) वाटपाचे आयोजन करणार आहे. या शोभायात्रेत पक्षाचे बडे नेतेही सहभागी होणार आहेत. Aam Aadmi Party will organize a Rally and Mahaprasad distribution in Delhi on January 22

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर विधीचा आज सहावा दिवस आहे. उद्या म्हणजेच 22 जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक होणार असून, त्यामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. साडेपाचशे वर्षांनी राम मंदिरात रामल्ला विराजमान होणार आहेत.

अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. अभिषेक करण्यापूर्वी राम मंदिराची भव्यता दिसून येते. फुलांनी सजवलेले मंदिर आणखीनच सुंदर दिसते. मंदिराचा प्रत्येक कोपरा फुलांनी सजवला आहे. मंदिराचे गर्भगृह हे त्याचे मुख्य आकर्षण आहे. येथून प्रभू रामलल्ला भाविकांना दर्शन देणार आहेत. राम मंदिर थायलंड आणि अर्जेंटिना येथून आणलेल्या सुंदर विदेशी फुलांनी सजवलेले आहे. आतील आणि बाहेरील सजावटीसाठी उत्कृष्ट लायटिंग करण्यात आली आहे.

Aam Aadmi Party will organize a Rally and Mahaprasad distribution in Delhi on January 22

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात