पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची ५४ जागांवर पकड

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीने ५४ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला धक्‍का दिला. काँग्रेस ८ , अकाली दल ५ तर भाजप दोन जागांवर आघाडीवर होती. मुख्‍यमंत्री चरणजीत चन्‍नी भदौड आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघात आघाडीवर आहेत. अमृतसर पूर्वमधून नवज्‍योत सिंग सिद्धू, मोहालीमध्‍ये बलबीर सिंग सिद्धू, जलालाबदमध्‍ये सुखबीर बादल आघाडीवर होते. Aam Aadmi Party holds 54 seats in Punjab



या निवडणुकीत पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारत ४६ जागांवर आघाडी घेतली. आघाडी कायम राहिल्‍यास पंजाबमध्‍ये सत्तांतर होणार आहे. प्रारंभी आप आणि काँग्रेसमध्‍ये काँटे की टक्‍कर होईल, असा अंदाज होता. पण एका तासामध्‍ये निकालाचे चित्र बदलले. ४८ जागांवर ‘आप’ची आघाडी झाली आहे.

गोव्यात कॉंग्रेस बहुमताच्या जवळ

यूपीच्या सुरुवातीच्या ७० मिनिटांत भाजपने १५० चा आकडा पार केला, सपा ८२ वर • पूर्वांचल आणि अवधमध्ये भाजप पुढे, पश्चिम उत्तर प्रदेशात सपाची कडवी टक्कर • AAP ४५ पंजाबच्या पहिल्या एक तासाच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस ३२ आणि अकाली आघाडी १५ जागांवर पुढे • उत्तराखंडच्या सुरुवातीच्या एका तासाच्या ट्रेंडमध्ये भाजपने ३६ जागांसह बहुमताचा टप्पा पार केला, कॉंग्रेस ३० जागांवर पुढे • गोव्यात कॉंग्रेस बहुमताच्या जवळ, मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर.

Aam Aadmi Party holds 54 seats in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात