वृत्तसंस्था
तिरुपती : आंध्रप्रदेशातील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराला ९.२ कोटी रुपयांची देणगी एका महिलेने दिली आहे. A woman from Chennai made Rs 9.2 crore In the name of Lord Tirupati Venkateswara
चेन्नईच्या डॉ. पर्वतम ( वय ७६ ) यांनी त्यांची संपत्ती मंदिराच्या नावावर केली होती. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. या महिलेच्या कुटुंबाने ३.२ कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह ६ कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे मंदिराला दिली आहेत.
मुलांसाठी हॉस्पिटल बनण्यासाठी त्यांनी ही रक्कम दिली आहे. डॉक्टर पर्वतम यांनी लग्न केले नव्हते. त्यांची इच्छा आपली संपत्ती मंदिराला सोपवायची होती. तिरुपती येथे बांधल्या जाणाऱ्या मुलांच्या रुग्णालयाला त्यांना मालमत्ता द्यायची होती. त्यांची बहीण रेवती विश्वनाथम यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीच्या अध्यक्षांना दान केलेल्या रकमेपैकी ३.२ कोटी रुपये चिल्ड्रन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्याचे आवाहन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App